शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, १५ नोव्हेंबरपासून राज्यात संपर्क दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 10:08 IST

कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती आता ठणठणीत होत आहे. दिवाळीनंतर जरांगे पुन्हा मैदानात उतरणार आहेत. राज्यभरातून त्यांना सभा घेण्यासाठी आमंत्रित केले जात असल्याने जरांगे-पाटील यांनी १५ नोव्हेंबरपासून  राज्यात संपर्क दौरा करण्याची घोषणा गुरुवारी केली.  

जरांगे-पाटील म्हणाले की, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, यासाठी राज्यातील सर्व मराठा समाजाने प्रत्येक गावात १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू करायचे आहे. कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे.

मात्र, मुख्यमंत्री याविषयी वेगळे बोलले असल्याच्या बाबीकडे जरांगे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री जे बोलले त्याविषयी २४ डिसेंबरला बोलू.  आता मराठा समाज कुणबी असल्याचे पुरावे मिळत आहेत. यामुळे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हे आता भुजबळ यांना  सहन होत नसल्याचे जरांगे म्हणाले.  

दौऱ्यात कुणाकडून एक रुपया घेत नाहीमराठा समाजाचे राज्यात सुरू असलेले आंदोलन हे सर्वसामान्य मराठ्यांनी एकत्र येऊन सुरू केले आहे. या आंदोलनासाठी कोणाकडूनही एक रुपयाही घेतला जात नाही. राज्यातील अधिकारी, राजकीय नेते आणि नागरिकांनाही आम्ही आवाहन करीत आहोत की, आंदोलनासाठी कोणीही एक रुपयाही देऊ नये. एवढेच नव्हे तर याआधी कुणी दिले असेल तर त्याचे नाव आम्हाला सांगावे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण