शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आधी घरी येऊन बांधली राखी नंतर पोलीस प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 13:36 IST

या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह तपास अधिकारी उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांनी मुलीचा इनकॅमेरा जबाब घेत ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

औरंगाबाद : पोलीस भरतीचे प्रशिक्षण देण्याचा बहाणा करून निराधार असलेल्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना ३१ ऑगस्ट रोजी घडली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्या आरोपीला या पीडितेने २४ ऑगस्ट रोजी राखी बांधली होती.

पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपी रामदास रामजी प्रसाद उर्फ पल्ल्या दादा (२५) यास अटक केली आहे. शहरात दोघी बहिणी राहतात. मोठी बहीण शहरातील खासगी रुग्णालयात नोकरी करते. यांच्या आईचे ११ वर्षांपूर्वी, तर वडिलांचे ४ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्या दोघींच्या शेजारी चुलते राहतात. मोठ्या बहिणीच्या तीन मित्रांपैकी एक आरोपी रामदास प्रसाद यास दोघींनी भाऊ मानले होते. त्यास २४ ऑगस्ट रोजी दोघींनी राखी बांधली. तेव्हा ओवाळणीसाठी पैसे नसून, १ तारखेपासून लहान बहिणीला पोलीस भरतीचे प्रशिक्षण देतो. तसेच त्यासाठी ट्रॅकसूट आणून देतो, असे आश्वासन देऊन तो निघून गेला. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता पीडितेची बहीण ड्युटीवर असताना आरोपी ट्रॅकसूट घेऊन घरी गेला. त्यास पीडिता नकार देत असताना मोठ्या बहिणीशी बोलणे करून देत तिला प्रशिक्षणासाठी परिसरातील मैदानाकडे घेऊन गेला.

मैदानाच्या जवळ आल्यानंतर पाऊस सुरू होताच एका चारचाकी वाहनाला हात करून थांबवत त्यात बसवून तिला पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीमध्ये नेलेे. त्या ठिकाणी एका रूममध्ये घेऊन जात व्यायाम करण्यास लावला. त्यानंतर काही वेळाने अत्याचार केले असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह तपास अधिकारी उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांनी मुलीचा इनकॅमेरा जबाब घेत ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी सुकन्या भोसले यांनी पीडितेला मानसिक आधार देत मदत केली.

मोबाइलमध्ये शूटिंगआरोपीने अल्पवयीन पीडितेवर अत्याचार करतानाची व्हिडीओ शूटिंग केली असून, कोणाला घटनेची माहिती दिल्यास व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, आरोपी व पीडितेला अत्याचार केलेल्या घटनास्थळापर्यंत अजय ठाकूर याने गाडीतून सोडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी मुंबईतील गुन्हेगारआरोपी रामदास प्रसाद मुंबईतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो काही मित्रांसोबत भाड्याने रूम घेऊन राहत होता. त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल असून, त्याचाही तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद