शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील मारहाणीत मृत्यू झालेल्या योगेशचा मृतदेह ३६ तासानंतरही घाटीतील शवागृहात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 19:32 IST

शवविच्छेदन झाल्यानंतर योगेशचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देकारागृहातील रक्षकांनी त्याला १८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता घाटीत उपचारासाठी दाखल केले होते. कोमात असताना उपचारादरम्यान १९ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मरण पावला होता. 

औरंगाबाद: न्यायालयीन बंदी योगेश राठोड याच्या खुनाचा संशय असलेल्या हर्सूल कारागृहातील संशयित अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना बडतर्फ करावे, योगेशच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये मदत द्यावी, योगेशच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी, यासह विविध मागण्यासाठी मृताच्या नातेवाईकांसह बंजारा समाजातील लोकांनी आज सलग दुसऱ्या दिवशी (दि. २१) योगेशचा मृतदेह ताब्यात घेण्यास  नकार देत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. यामुळे योगेशच्या मृत्यूला ३६ तास उलटल्यानंतरही त्याचा मृतदेह घाटी रुग्णालयातील शवागृहात पडून आहे. आंदोलनावर पोलीस अधिकारी कर्मचारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

मयुरपार्क  परिसरातील घृष्णेश्वर कॉलनी येथील रहिवासी योगेश रोहिदास राठोड (वय २९) यास वारंवार फिट्सचा त्रास होऊन तो बेशुद्ध पडल्याचे सांगून हर्सूल कारागृहातील रक्षकांनी त्याला १८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता घाटीत उपचारासाठी दाखल केले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर योगेशचे नातेवाईक त्याला पाहण्यासाठी घाटीत दाखल झाले तेव्हा योगेशच्या संपूर्ण अंगावर मारहाणीचे वळ होते. शिवाय तो कोमात असताना उपचारादरम्यान १९ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मरण पावला होता. 

यानंतर हर्सूल कारागृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मारहाण करून योगेशचा खून केला, त्यांच्याविरोधात खूनाचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणी करीत योगेशच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात आंदोलन सुरू केले. २० जानेवारी रोजी दुपारी ईन कॅमेरा शवविच्छेदन झाल्यानंतर योगेशचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी मृताचा भाऊ सचिन राठोड यांनी दिेल्या तक्रारीवरून हर्सूल ठाण्यात संशयित आरोपी म्हणून कारागृह अधिक्षक आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र पोलिसांनी एकाही आरोपीला अटक न केल्याने आंदोलन सुरूच ठेवत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने घटनेच्या ३६ तासानंतर योगेशचा मृतदेह घाटीतील शवागृहात पडून आहे.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीDeathमृत्यूPrisonतुरुंगPoliceपोलिस