शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

भौतिक सुविधा, अध्यापक नसलेल्या ५ महाविद्यालयांना प्रवेशबंदी, २ लाख दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 12:33 IST

कुलगुरूंचा निर्णय : संलग्नीकरण देणाऱ्या समित्यांचीही होणार चौकशी

औरंगाबाद : चिश्तिया कला महाविद्यालय, खुलताबाद, राजकुंवर महाविद्यालय, धावडा आणि फर्दापूर, कै. श्रीनिवासरावजी दगडूजी देशमुख संगणक व व्यवस्थापन महाविद्यालय, भोकरदन, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बदनापूर या पाच महाविद्यालयांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड येत्या पंधरा दिवसांत भरण्याचे आदेश कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सोमवारी दिले, तसेच या महाविद्यालयातील भौतिक सुविधा व आवश्यक अध्यापक नसलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना नवीन प्रवेशास बंदी करण्यात आली आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठीने ठरवून दिलेले नियम, निकषांचे उल्लंघन करणाऱ्या १० महाविद्यालयांतील सोयी-सुविधांची पडताळणी केली. त्यानंतर व्हिडीओ चित्रफितीसह सत्यशोधन अहवाल समित्यांनी कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्याकडे सादर केला. त्यावर गुरुवारी (दि. २१) ५ महाविद्यालयांची बाजू कुलगुरूंनी ऐकून घेतली, तर ५ महाविद्यालयांची सुनावणी अद्याप बाकी आहे. सोयी-सुविधा न देणे, आवश्यक अध्यापकांची नेमणूक न करणे, शासन आदेशाचे उल्लंघन करणे, पायाभूत सुविधा नसल्याने पाच महाविद्यालयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड आकारून काही अभ्यासक्रमांचे यावर्षी प्रवेश बंद करण्याचे आदेश दिले. पुढील सहा महिन्यांत बंद केलेल्या अभ्यासक्रमासंबंधी त्रुटीपूर्तता करून अनुपालन अहवाल सादर करावा. त्यानंतर ते अभ्यासक्रम सुरू ठेवण्याबाबत निर्णय तज्ज्ञ समितीच्या तपासणीनंतर विद्या परिषदेद्वारे घेतला जाईल, असे कुलगुरूंनी आदेशात म्हटले आहे.

या महाविद्यालयांवरही झाली कारवाईकला वाणिज्य महाविद्यालय, बदनापूर, श्रीनिवासरावजी दगडूजी देशमुख संगणक व व्यवस्थापन महाविद्यालय, भोकरदन, चिश्तिया कला महाविद्यालय, खुलताबाद, राजकुंवर महाविद्यालय, धावडा आणि (धनवट) फर्दापूर या पाच महाविद्यालयांवर अनियमिततेचा ठपका ठेवत विद्यापीठाने कारवाई केली आहे. यापैकी काही महाविद्यालयांत अभ्यासक्रमनिहाय अध्यापकांची नियुक्ती नाही, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची क्षमता ६० वरून ३० करण्यात आली, विनाअनुदानित तत्त्वावरील पदवी व पदव्युत्तरच्या तुकड्यांचे प्रवेश थांबवण्यात आले, नॅक मूल्यांकन नाही.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद