शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद ! महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले उपग्रह आकाशात झेपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:26 IST

प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका शाळांमधील दहा विद्यार्थ्यांची जागतिक विक्रमाच्या माेहिमेसाठी जानेवारी महिन्यात निवड झाली होती.

ठळक मुद्देरविवारी रामेश्‍वरम् येथून उपग्रह आकाशात सोडण्यात आले

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनद्वारा आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज-२०२१ साठी औरंगाबाद महापालिका शाळेच्या दहा विद्यार्थ्यांनी बनवलेले उपग्रह रविवारी अवकाशात झेपावले. देशातील शंभर विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे उपग्रह रामेश्‍वर येथून बलूनद्वारे आकाशात सोडण्यात आले.

प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका शाळांमधील दहा विद्यार्थ्यांची जागतिक विक्रमाच्या माेहिमेसाठी जानेवारी महिन्यात निवड झाली होती. सोनाली यादव, सूरज जाधव, विशाल वाहुळ, गुलनाज सय्यद, राणी चोपडे, नंदिनी मोटे, प्रतिमा म्हस्के, साहिल केदारे, इरशाद खान व रूपाली गायकवाड या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण काही दिवसांपासून सुरू होते. पुणे येथील प्रशिक्षण केंद्रातही त्यांना प्रशिक्षण देऊन उपग्रह बनविण्यात आला. डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल फाउंडेशनच्या स्पेस रिसर्च या फाउंडेशनचे समन्वयक मिलिंद चौधरी आणि मनिषा चौधरी यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. 

रविवारी रामेश्‍वरम् येथून उपग्रह आकाशात सोडवतानाचे थेट प्रक्षेपण पाहताना इंदिरानगरच्या शाळेत प्रकल्प समन्वयक शशिकांत उबाळे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, रश्मी होंमुटे, सुरेखा महाजन यांची उपस्थिती होती. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, भारतीय बुक रेकॉर्ड, एशियन बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड्स हे पाच प्रमाणपत्र कुरिअरद्वारे मिळणार असल्याची माहिती संजीव सोनार यांनी दिली.

सर्वात कमी वजनाचे उपग्रहजगात सर्वात कमीत कमी २५ ग्रॅम वजनाचे ते जास्तीत जास्त ८० ग्रॅम वजनाचे १०० उपग्रह बनवून त्यांना ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर सायंटिफिक बलूनद्वारे प्रक्षेपित करणारा हा उपक्रम होता. हे उपग्रह आकाशात सोडल्यानंतर तिथून प्रत्यक्ष वातावरणाची माहिती पाठवणार आहेत. त्यामुळे या उपक्रमात औरंगाबाद पालिका विद्यार्थ्यांचाही सहभाग असणे, ही बाब गौरवास्पद आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEducationशिक्षण