शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये सभेस आदित्य ठाकरेंना अखेर परवानगी मिळाली,पण एक बदल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 19:28 IST

गेल्या काही दिवसांपासून मंत्री अब्दुल सत्तार आणि आदित्य ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे.

सिल्लोड (औरंगाबाद):  शहरात होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. मात्र, पूर्वीची जागा नाकारून सिल्लोड पोलिस व नगर परिषदेने त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील खुल्या मैदानावर सभेसाठी परवानगी दिली आहे. आज सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार व स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हे ठिकाण ठरले. 

आदित्य ठाकरे यांची ७ नोव्हेंबरला सिल्लोड येथील महावीर चौकात सभा होणार होती. त्यासाठी ठाकरे गटाकडून सिल्लोड पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. तर दुसरीकडे त्याच दिवशी महावीर चौकाच्या अगदी समोर जिल्हा परिषद मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे आयोजन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. दरम्यान, पोलिसांनी खा. श्रीकांत शिंदे यांच्या सभेला परवानगी दिली. मात्र आदित्य ठाकरे यांच्या महावीर चौकातील सभेला कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारली. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. त्यानंतर पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाने बैठक घेत आदित्य ठाकरे यांच्या सभेस ठिकाण बदलून परवानगी दिली. 

सत्तार यांचे आव्हान स्वीकारत आदित्य सिल्लोडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मंत्री अब्दुल सत्तार आणि आदित्य ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान छोटा पप्पू म्हणून सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला होता. सत्तार यांच्या आरोपाला थेट उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ७ नोव्हेंबरला सिल्लोडमध्ये सभा घेण्याची घोषणा केली. आदित्य यांनी सभेची घोषणा करताच अब्दुल सत्तार यांनी त्याच दिवशी सिल्लोडमध्ये खा. श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे आयोजन केले. आता शिंदे यांच्या सभेतून पुन्हा एकदा अब्दुल सत्तार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. आदित्य विरुद्ध सत्तार आणि शिंदे असा सामना येत्या सोमवारी होत असल्याने राजकारण आतापासून चांगलेच तापले आहे.  

चौकात परवानगी देता येत नाहीआदित्य ठाकरे यांच्या सभेला महावीर चौकात परवानगी मागितली होती. न्यायालयाच्या आदेश आहे चौकात परवानगी देता येत नाही म्हणून महावीर चौकातील परवानगी नाकारली आहे. त्यांना जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौका जवळ खुल्या मैदानावर सभा घेण्यास  परवानगी दिली आहे.- अशोक मुदिराज पोलीस निरीक्षक सिल्लोड शहर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAditya Thackreyआदित्य ठाकरेAbdul Sattarअब्दुल सत्तार