शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

लिहून देतो, आदित्य ठाकरे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार; चंद्रकांत खैरेंचे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 16:13 IST

'ते आदित्य ठाकरेंना घाबरतात, ठाकरे कुटुंबाचा द्वेष करतात.'

छत्रपती संभाजीनगर: अलीकडेच(दि.16) छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाड्यासाठी 45 हजार कोटींच्या विविध योजनांची घोषणा करण्यात आली. यावरुन विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे. दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही या योजनांवरुन सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे लवकरच मुख्यमंत्री होणार, असे भाकितही केले.

आदित्य ठाकरेमुख्यमंत्री होणारशहरातील प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानातील वाघिणीने दोन पिलांना जन्म दिला. त्यांचे नाव ठेवण्यासाटी चिठ्ठ्या काढण्यात आल्या होत्या. यावेळी अजित पवारांनी काढलेल्या चिठ्ठीवर आदित्य नाव आले, पण ती चिठ्ठी बदलण्यात आली. यावर खैरेंना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, सरकार आदित्य ठाकरेंना घाबरते. शेतकऱ्यांच्या बांधावर आदित्य ठाकरे गेले, हे गेले नाही. हे सगळे ठाकरे कुटुंबाचा द्वेष करतात. ठाकरे कुटुंबानेच यांना मोठं केलं. एक ना एक दिवस आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होणार. लिहून ठेवा माझं वाक्य, आदित्य ठाकरे लवकरच मुख्यमंत्री होणार,' असे भाकित खैरेंनी केले.

मराठवाड्याला काही दिले नाहीखैरेंनी सरकारच्या पॅकेजवरही टीका केली. सरकारने मराठवाड्यासाठी काही दिले नाही. महापालिकेचा 850 कोटींचा प्रस्तावही मान्य झालेला नाही. चारशे कोटींचा देऊ सांगितले, पण दिले नाही. मराठवाड्यातील उबाठा गटाच्या आमदारांना काही दिले नाही. त्यांचे समर्थक आमदार आहेत, त्यांना भरपूर निधी दिला. उद्धव ठाकरेंनी सिंचनाचा मुडदा पाडला, या टीकेवर खैरे म्हणाले, यांनीच सिंचनाचा मुडदा पाडला आहे. त्यावेळी अर्थमंत्री कोण होते, आता तेच सत्तेत जाऊन बसलेत. या सरकारने मराठवाड्याला काही दिले नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्री