शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

'माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला..? सर्व चांगलं सुरू असताना गद्दारी का केली..?'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2022 21:14 IST

'ज्यांना फसवणूक झाली आणि पळवले असे वाटत असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले आहे अन् असतील.'- आदित्य ठाकरे

औरंगाबाद: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांची मुठ बांधण्यासाठी शिवसंवाद यात्रा सुरू केली. ही यात्रा आज औरंगाबाद शहरात आली, यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला.

सर्व चांगलं सुरू असताना गद्दारी का? यावळी आदित्य ठाकरे यांनी शहराला दिलेल्या निधीचा उल्लेख केला. ते म्हाले, 'आम्ही शरहाला 552 कोटींचा फंड शहराला दिला. 100 कोटी जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला दिले. धक्का याचा लागला की, ज्यांना आपले समजलो त्यांनीच घात केला. बंडखोरी पूर्वी तात्पुरते सत्तेत असलेले गद्दार आमदार माझ्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते. त्यांचे खरे मुखवटे फाटले आहेत. ठाकरे परिवारावर प्रेम करणाऱ्यांनी आज आम्हाला धमक्या देत आहेत. मला जनतेने दिलेले असुड मी चालवणार नाही, कारण आता लोकशाही आहे. मतदारांनी मतदानातून धडा शिकवावा,' असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

संबंधित बातमी- 'सरकारची सुरुवात रायगडच्या डागडुजीपासून अन् शेवट संभाजीनगरवर': आदित्य ठाकरे

'बेकायदेशीर सरकार कोसळणारच...'ते पुढे म्हणाले की, हात जोडून सर्वांना शिवसैनिकांनी विचारावे गड्डारी का केली? ज्यांनी ओळख दिली त्या उद्धव यांच्या पाठीत खंजीर का खुपसला? आम्ही जास्त दिल्याने यांना अपचन झालं, आता जेलुसिल घ्यायला हे तिकडे गेले. मला अनेकांनी सांगितलेलं राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं, म्हणून बाळासाहेबांच्या मुलाला पायउतार केलं ते हेच दाखवायला की चांगल्याना स्थान नसतं. देशभरात झालेल्या अनेक सर्व्हेतून पुढे आलं आहे की काम करणारा सीएम हीच उद्धव यांची ओळख. आता आलेलं सरकार बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे, हे सरकार लवकरच कोसळणारच,' असा दावाही त्यांनी यावेळी केला.

माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला..?ते पुढे म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी आपल्या अखत्यारीतील खाती यांना दिली, पण तरीदेखील त्यांच्यात नाराजी होती. एवढं देऊन माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला. जिथे गेलात तिथे सुखात राहा, पण राहण्यासाठी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा. जनता ठरवेल ते मान्य असेल. ज्यांना फसवणूक झाली आणि पळवले असे वाटत असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले आहे अन् असतील,' असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद