शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Aditya Thackeray DJ Clash: 'माफी मागतो, पण एवढे मोठे कारण नाही'; डीजेवरून राडा प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 23:41 IST

डीजे बंद केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलिस बंदोबस्तात ठाकरेंचा ताफा बाहेर काढण्यात आला.

औरंगाबाद: युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मंगळवारी शिवसंवाद कार्यक्रमासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे आले होते. यावेळी डीजे बंद केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलिस बंदोबस्तात ठाकरेंचा ताफा बाहेर काढण्यात आला. यावर आता आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आली आहे. 

ठाकरे गटाच्या युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सातव्या शिवसंवाद यात्रेनिमित्त मंगळवारी सायंकाळी नाशिक जिल्ह्यातून औरंगाबादच्या दौऱ्यावर आले. वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे त्यांचा शिवसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम स्थळापासून हाकेच्या अंतरावर रमाबाई आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम सुरू होता. कार्यकर्ते डी.जे.लावून जयंती उत्सव साजरा करीत होते. या डीजेचा आदित्य यांच्या भाषणाला अडथळा येत असल्याचे पाहून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी डीजे बंद करायला लावला. यातून वाद झाला. यानंतर हा वाद चिघळला. हे लक्षात येताच आदित्य यांनी स्टेजवरून उतरून उपस्थितांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी शिवशक्ती, भिमशक्ती यांची युती झाली आहे. मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला डीजे वाजवायचा असेल तर वाजवा, असे म्हणाले. मात्र डीजे बंद केल्याने तेथे गदारोळ झाला. 

यावेळी तणाव वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कडक बंदोबस्तात आदित्य यांचा ताफा महालगावातून बाहेर काढला. यावेळी काहींनी या ताफ्यावर दगडफेक केल्याने तणाव वाढल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. पोलिसांनी महालगावात शांतता असल्याचे स्पष्ट  केले.

या साऱ्या प्रकारावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मी माईकवर बोललो, काही कारणास्तव साऊंड बंद झाला असेल. एकमेकांना समजून घ्यावे लागते. मी माईकवर माफीही मागितली. संविधानाच्या रक्षणासाठी शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आलीय. काही अडचण आली असेल तर माफी मागतो. पण एवढे मोठे कारण नाही. डीजे ५-१० मिनिटांसाठी बंद केला असेल. पण मी माईकवर सांगितले डिजे चालू द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद