शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

'आदित्य सरोवर, अंबादास उद्यान, चंद्रकांत लॉन'; शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2022 12:39 IST

आदित्य सरोवर, अंबादास फुलपाखरू उद्यान, चंद्रकांत योग लॉन नामकरणावर टीका होत असून भाजपने शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय ? असा सवाल केला आहे

औरंगाबाद : खामनदीचे पुनरुज्जीवन केल्यावर विविध उपक्रमांचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी करण्यात आले. या ठिकाणी सरोवर, उद्यान, लॉन आणि ऑक्सिजन हबला शिवसेना मंत्री, आमदार, नेत्यांची नावे देण्यात आल्याने भाजपने यावर सडकून टीका केली आहे. शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय, असा सवाल करीत भाजपने या प्रकाराबाबत केंद्र शासनाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.

आदित्य सरोवर, चंद्रकांत योग लॉन, अंबादास फुलपाखरू उद्यान, सुभाष ऑक्सिजन हब अशी काही नावे खामनदी परिसरातील उपक्रमांना देण्यात आली आहेत. यावरून आता शिवसेनेसह पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. महापालिका, स्मार्ट सिटी, इको सत्त्व, छावणी नगर परिषद, व्हेरॉक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या माझी वसुंधरा मोहिमेंतर्गत खामनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत विविध विकासकामे करण्यात आली आहेत. हे सगळे उपक्रम शिवसेना नेत्यांच्या योगदानातून राबविलेले आहेत काय, असा सवाल भाजपने केला आहे.

जनतेच्या पैशातून खूश करण्याचा प्रकारखामनदीचे पुनरुज्जीवन केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून झाले आहे. स्मार्ट सिटीला केंद्राचा निधी आहे. त्या निधीचा दुरुपयोग होत असेल तर आम्ही विरोध करणार. प्रशासनाने जनतेच्या पैशातून वैयक्तिक कुणाला खूश करण्यासाठी असे प्रयत्न करणे योग्य नाही. या सगळ्या प्रकरणाची केंद्र शासनाकडे लेखी तक्रार तर करूच, शिवाय अधिवेशनातदेखील हा मुद्दा उचलून धरू, असा इशारा आ.अतुल सावे यांनी दिला.

या कामासाठी सगळ्यांचे योगदानखामनदी पुनरुज्जीवन प्रकल्पांत शिवसेना मंत्री, नेते, लोकप्रतिनिधींची नावे देण्याची गरज काय आहे? शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर असल्याप्रमाणे हा प्रकार आहे. महापालिका, स्मार्ट सिटी, छावणी नगर परिषद या संस्थांचे यात याेगदान आहे. शासनाच्या माझी वसुंधरा मोहिमेचा हातभार आहे. त्यामुळे अशी नावे देताना प्रशासकीय यंत्रणेनेदेखील विश्वासात घेणे गरजेचे होते. या सगळ्या हुजरेगिरीवर भाजप आंदोलन करणार असल्याचा इशारा शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAditya Thackreyआदित्य ठाकरेAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका