औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी १५० नव्या कोरोनाबाधितांची भर, १ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 02:06 PM2020-11-28T14:06:48+5:302020-11-28T14:08:04+5:30

९०१ जणांवर उपचार सुरू, बाधित ४३ हजार पार

Addition of 150 new corona victims in Aurangabad district on Friday, 1 death | औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी १५० नव्या कोरोनाबाधितांची भर, १ मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी १५० नव्या कोरोनाबाधितांची भर, १ मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात ४१,०२० कोरोनामुक्तमनपाकडून शुक्रवारी १२१० नागरिकांची तपासणी

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी १५० कोरोनाबधितांची भर पडली. तर एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिवसभरात १०४ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना विविध रुग्णालयांतून सुटी देण्यात आली. त्यात शहरातील ९० आणि ग्रामीणमधील १४ जणांचा समावेश आहे. 

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४३ हजार ६४एवढी झाली आहे. तर ४१ हजार २० कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण ११४३ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ९०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. घाटीत पडेगावातील ६४ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

मनपा हद्दीतील १२७ रुग्ण
उस्मानपुरा १, एम. जी. एम. कॉलेज रोड सेव्हन हिल परिसर १, प्रफुल हौ. सो. ५, एन सहा सिडको १, समर्थनगर, क्रांतीचौक १, एन ७ जयलक्ष्मी कॉलनी १, युनिव्हर्सिटी कॅम्प १,  साक्षी रेसीडीयन चिकलठाणा १,  समाधान कॉलनी ३, पोलीस कॉलनी २, खुराणानगर १,  विजयनगर १, न्यायनगर १, शिवशंकर कॉलनी ३,  बीड बायपास परिसर २,  शिवाजीनगर, सिडको निर्मल हॉस्पिटल २, एन १ सिडको १,  नॅशनल कॉलनी १, शिवाजीनगर एन ९ सिडको १,  नागेशवाडी १, चिकलठाणा १, रोकडीया हनुमान कॉलनी ३, राधामोहन कॉलनी १, अरिहंतनगर १, नाईकनगर, देवळाई १, कासारी बाझार २, एन ३ सिडको १, देशमुख निवास १, हडको १,  बेगमपुरा १, कांचनवाडी १, देवगिरी हॉस्टेल १, बजरंग कॉलनी १, भारतनगर, गारखेडा १, समर्थनगर २, साई शंकर  खडकेश्वर २, हनुमाननगर १, बीड बायपास परिसर ३, परिमल हौसिंग सोसायटी १,  उल्कानगरी १, एकनाथनगर, उस्मानपुरा १,  एन ७ सिडको १, मयूर पार्क, शिवेश्वर कॉलनी १, वसंतनगर १, एन ७ बजरंग कॉलनी १, राजे संभाजी कॉलनी , जाधववाडी १ व अन्य ६३ जण बाधित आढळून आले.

ग्रामीणमध्ये २३ रुग्ण
कन्नड १, डोणगाव, करमाड १, पोलीस कॉलनी, साजापूर १, देवगाव रंगारी, कन्नड १ अन्य १९ जण बाधित आढळून आले.

मनपाकडून शुक्रवारी १२१० नागरिकांची तपासणी
महापालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी शहरात १२१० नागरिकांची तपासणी केली. अँटिजन तपासणीत ३४ नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले. ८७३ नागरिकांची आरटीपीसीआर पद्धतीने तपासणी करण्यात आली. त्यांच्या लाळेचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. शनिवारी सकाळी महापालिकेला यासंबंधीचा अहवाल प्राप्त होईल.
 

Web Title: Addition of 150 new corona victims in Aurangabad district on Friday, 1 death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.