शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पालकांची चिंता वाढवणारी बाब, मोठ्यांपेक्षा चिमुकल्यांमध्ये भाजण्याचे प्रमाण अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 11:42 IST

घरातील कामात व्यस्त होताना मुलांकडे दुर्लक्ष करणे पडले अनेकांना महागात पडले आहे

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : साधा चटका लागला तर ‘आई गं...’ असा शब्द प्रत्येकाच्या तोंडातून बाहेर पडतो. मग चटक्यापेक्षा भाजणाऱ्यांच्या स्थितीचा विचारही केलेला नको. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांत मोठ्या व्यक्तीच्या तुलनेत १२ वर्षांखालील लहान मुलांचे भाजण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घरातील कामांमध्ये व्यस्त राहणाऱ्या कुटुंबीयांनी लहान मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

घाटी रुग्णालयात विविध कारणांनी भाजल्या जाणाऱ्या रुग्णांवर स्वतंत्र वाॅर्डात उपचार केले जातात. गेल्या २० महिन्यांत याठिकाणी दाखल झालेल्या १२ वर्षांखालील मुलांची संख्या अधिक आहे. या वयोगटातील तब्बल १३८ मुलांवर उपचार करण्यात आले. इतर वयोगटांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे ही वेळ येण्याआधीच पालकांनी सजग राहण्याची गरज आहे. घाटीतील सर्जरी विभागप्रमुख डाॅ. सरोजिनी जाधव, डाॅ. सुरेश हरबडे, डाॅ. मोहम्मद अन्सारी, डाॅ. जुनेद शेख, डाॅ. फय्याज अली, डाॅ. अनिता कंडी, डाॅ. प्रवीणकुमार वासडीकर हे रुग्णांच्या उपचारासाठी प्रयत्नशील असतात.

का भाजतात चिमुकले अंगावर गरम पाणी, अंगावर गरम भाजी पडल्याने, खेळता खेळता चुलीवर, गॅसवर पडल्याने, फटाके उडविताना यासह काही अपघाताच्या घटनांमुळेही बालके भाजण्याच्या घटना घडतात. काडीपेटीशी खेळताना अचानक आग लागूनही मुले भाजण्याच्या घटना होतात. त्यामुळे लहान मुलांना अशा वस्तूंपासून दूर ठेवले पाहिजे, असे तज्ज्ञांनी म्हटले.

मोठ्या व्यक्ती भाजण्याची कारणेक्षणिक रागात अनेक व्यक्ती जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. त्याबरोबर आग लागण्याच्या घटनांमध्येही व्यक्ती भाजण्याच्या घटना होतात.

इलेक्ट्रिक बर्न गेल्या काही वर्षांत विद्युत तारांना स्पर्श होणे यासह विद्युत उपकरणांतील बिघाडामुळे भाजण्याच्या घटनाही होत आहेत. गेल्या २० महिन्यांत इलेक्ट्रिक बर्नमुळे भाजलेल्या ४९ व्यक्तीवर घाटीत उपचार करण्यात आले.

घाटीतील उपचार झालेल्या भाजलेल्या रुग्णांची स्थिती (जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२२)१२ वर्षांखालील- ७०-६८- १३ ते २०-२०-७-२१ ते ३० - ५३-३१-३१ ते ४०-४२-२३-४१ ते ५०-१६-९-५१ ते ६०-१२-११-६० वर्षांवरील-७-१९

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी