शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

संत परंपरेला आधुनिकतेची जोड! पैठणमध्ये राज्यातील पहिला तीन मजली डिजिटल कीर्तन हॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:19 IST

परंपरेला आधुनिकतेची जोड, राज्यातील पहिल्या पैठणच्या डिजिटल कीर्तन हॉलची १५०० आसन क्षमता

- दादासाहेब गलांडेपैठण : संत एकनाथ महाराजांच्या पुण्यभूमी असलेल्या पैठणनगरीत श्रद्धा आणि आधुनिकतेचा संगम साधणारा राज्यातील पहिलाच डिजिटल कीर्तन हॉल उभारला जात आहे. नाथ मंदिर परिसरात गोदावरीच्या पात्रालगत सुरू असलेल्या या प्रकल्पात तीन मजली गोलाकार गॅलरी, अद्ययावत ध्वनीप्रणाली, वातानुकूलन, डिजिटल एलईडी प्रोजेक्शनसह १५०० आसन क्षमतेचा भव्य कीर्तन हॉल तयार होणार आहे. या प्रकल्पाचे काम पुढील वर्षभरात पूर्ण होईल, अशी माहिती सां.बा. विभागाचे सहायक अभियंता राजेंद्र बोरकर यांनी दिली.

या कीर्तन हॉलची रचना बंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ध्यानसाधना केंद्राच्या धर्तीवर असून, सध्या ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. १०० फूट व्यास व ८० फूट उंच असलेली ही वास्तू केवळ कीर्तनासाठी नाही, तर नवोदित कीर्तनकारांसाठी प्रशिक्षण व सादरीकरणाची सुवर्णसंधी ठरणार आहे.

परंपरेला आधुनिकतेची जोडनाथ मंदिर परिसरात भव्य दिव्य वास्तू निर्माण करण्याची खासदार संदीपान भुमरे यांची इच्छा होती. परंपरेला आधुनिकतेची जोड मिळाल्याने पैठणचे धार्मिक-सांस्कृतिक वैभव नव्या पर्वाकडे वाटचाल करेल.- आमदार विलास भुमरे, अध्यक्ष, नाथ संस्थान

कीर्तनकारांसाठी पर्वणीराज्यात आजपर्यंत कुठल्याही देवस्थानाने अशा प्रकारचा कीर्तन हॉल उभारलेला नाही. नवोदित कीर्तनकार व बाल वारकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार असून, ही वास्तू म्हणजे सेवा व साधनेचा अनोखा संगम आहे.-हभप. विठ्ठलशास्त्री चनघटे

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरspiritualअध्यात्मिक