शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात

By राम शिनगारे | Updated: August 7, 2023 12:03 IST

घोटाळ्याचा प्लॅन देणाऱ्या आरोपीस बेड्या; मुंबईतून शहरात परतल्यानंतर पोलिसांनी पकडले

छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्ज घोटाळ्याच्या मास्टरमाइंडला शहर पोलिसांच्या विशेष पथकाने एका हॉटेलमध्ये बेड्या ठोकल्या. या आरोपीने अध्यक्ष अंबादास मानकापे याच्यासह इतरांना घोटाळा करण्याचा प्लॅन दिल्याची माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आली होती. तेव्हापासून मास्टरमाइंड मुंबई, पुणे अशा विविध शहरांमधील आलिशान हॉटेलमध्ये लपून बसत होता. शनिवारी शहरात आल्यानंतर सिडको परिसरातील एका हॉटेलमध्ये असतानाच त्यास पकडले. या घोटाळ्यात पोलिसांनी सहाव्या आरोपीला अटक केला आहे.

नामदेव दादाराव कचकुरे (५२, रा.शेंद्रा) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श नागरी पतसंस्थेत २०२ कोटींच्या घोटाळ्यात अध्यक्ष अंबादास मानकापे याच्यासह इतर पाच जणांना शहर पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या दोन आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत नामदेव कचकुरे हा सर्व घोटाळ्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र, तो फरार होता. मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये राहत होता. तेथून शनिवारी सकाळी कचकुरे हा शहरातील सिडको भागातील एका हॉटेलमध्ये उतरला. त्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला मिळताच, सहायक निरीक्षक सय्यद मोसीन, उपनिरीक्षक कल्याण शेळके, अजित दगडखैरे, सहायक फाैजदार हबीब शेख, हवालदार शिवाजी भोसले, अजय दहिवाल यांनी हॉटेलवर छापा मारला. तेव्हा त्या ठिकाणी नामदेव कचकुरे हा सापडला. त्यास सिडको ठाण्यात आणल्यानंतर गुन्ह्यात आरोपी करून अटक केली आहे.

बनावट कर्ज प्रकरणात पटाईतनामदेव कचकुरे हा आदर्श नागरी पतसंस्थेच्या शेंद्रा येथील शाखेत कर्ज प्रकरणे पाहणारा कर्मचारी होता. त्या ठिकाणीच त्याने बनावट कागदपत्रे, संपत्ती दाखवून कर्ज मंजूर करण्याची योजनाच अध्यक्ष मानकापे याच्यासह दोन संचालकांनी सांगितली. त्यानुसार, २०२ कोटी रुपयांचे बनावट कर्जांचे वाटप केल्याचे अटकेतील व्यक्तींनी कबुली पोलिसांकडे दिली होती. त्याचा मास्टरमाइंड हा कचकुरेच असल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

कचकुरेची पत्नी शेंद्रयाची सरपंचशहर पोलिसांनी अटक केलेल्या नामेदव कचकुरे याची पत्नी शेंद्रा ग्रामपंचायतीची विद्यमान सरपंच असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नामेदव हा ‘एनडी’ या नावानेच फेमस असून, आदर्श पतसंस्थेत त्याचीच चलती होती, अशीही माहिती समोर आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbankबँकAurangabadऔरंगाबाद