शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श बँकेच्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 07:19 IST

मुंबईतून परतताच हाॅटेलमध्ये पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्ज घोटाळ्याच्या मास्टरमाइंडला शहर पोलिसांच्या विशेष पथकाने एका हॉटेलमध्ये बेड्या ठोकल्या. या आरोपीने अध्यक्ष अंबादास मानकापे याच्यासह इतरांना घोटाळा करण्याचा प्लॅन दिल्याची माहिती चौकशीतून समोर आली होती.

तेव्हापासून मास्टरमाइंड मुंबई, पुणे अशा विविध शहरांमधील आलिशान हॉटेलमध्ये लपून बसत होता. शनिवारी शहरात आल्यानंतर सिडको परिसरातील एका हॉटेलमध्ये असतानाच त्यास पकडले. या घोटाळ्यात पोलिसांनी सहाव्या आरोपीला अटक केली आहे.

नामदेव दादाराव कचकुरे (५२, रा.शेंद्रा) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श नागरी पतसंस्थेत २०२ कोटींच्या घोटाळ्यात अध्यक्ष अंबादास मानकापे याच्यासह इतर पाच जणांना अटक केली आहे. 

हॉटेलवर मारला छापा n अटक केलेल्या दोन आरोपींनी नामदेव कचकुरे हा घोटाळ्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. n मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये तो राहत होता. तेथून शनिवारी सकाळी तो शहरातील सिडको भागातील एका हॉटेलमध्ये उतरला. त्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला मिळताच पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला आणि नामदेव कचकुरेला पकडले.

बनावट कर्ज प्रकरणात पटाईतनामदेव कचकुरे हा आदर्श नागरी पतसंस्थेच्या शेंद्रा येथील शाखेत कर्ज प्रकरणे पाहणारा कर्मचारी होता. त्या ठिकाणीच त्याने बनावट कागदपत्रे, संपत्ती दाखवून कर्ज मंजूर करण्याची योजनाच अध्यक्ष मानकापे याच्यासह दोन संचालकांना सांगितली. त्यानुसार, २०२ कोटी रुपयांचे बनावट कर्जांचे वाटप केल्याची कबुली अटकेतील व्यक्तींनी दिली होती.  

कचकुरेची पत्नी शेंद्र्याची सरपंच  नामदेव कचकुरे याची पत्नी शेंद्रा ग्रामपंचायतीची विद्यमान सरपंच असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नामदेव हा ‘एनडी’ या नावाने फेमस असून, आदर्श पतसंस्थेत त्याचीच चलती होती, अशीही माहिती समोर आली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी