शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात दिल्लीगेट ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत २४५ मालमत्तांवर हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 17:20 IST

हिमायत बाग, आझाद महाविद्यालय, हडको कॉर्नरपर्यंत पाडापाडी

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत सोमवारी दिल्लीगेट ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत २४५ मालमत्तांवर कारवाई केली. अडीच किमी अंतर असलेल्या या रस्त्यावर दोन्ही बाजूने पाच वेगवेगळ्या पथकांनी लहान मोठी अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. दिल्लीगेट वगळता कुठेही तणावाची स्थिती नव्हती. मालमत्ताधारकांनी स्वत:हून आपले सामान काढून घेतले होते.

सोमवारी सकाळी महापालिकेचे १५०, पोलिसांचे १०० अधिकारी, कर्मचारी दिल्लीगेट येथील पेट्रोल पंपासमोर दाखल झाले. पंपासमोरील मनपाच्या खुल्या जागेला लागून असलेल्या अनधिकृत मालमत्तांवर अवघ्या अर्ध्या तासात कारवाई केली. जवळपास १० पेक्षा अधिक मालमत्ता जमीनदोस्त केल्या. पथक थोडे पुढे सरकले. दिल्लीगेटच्या उजवीकडील मालमत्तांवर दोन ते तीन मजली इमारतींवर जेसीबी, पोकलेन लावण्यात आला. हळूहळू तणाव वाढत गेला. बघ्याची गर्दीही हजारोंच्या आसपास होती. पोलिसांनी अनेकदा काठ्या उगारताच नागरिक सैरावैरा पळू लागले. पाच मिनिटांनंतर परत तीच परिस्थिती निर्माण होत होती. याचवेळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागविण्याचा निर्णय मनपा, पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला. तीन मजली जिमच्या मालकाने इमारत अधिकृत करण्यासाठी मनपाकडे अर्ज केला होता. गुंठेवारीसाठी १० लाखांचा धनादेश मनपा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. त्यानंतरही मनपा अधिकाऱ्यांनी जिमच्या दर्शनी भागाची मोठी तोडफोड केली. शेजारील ४ मालमत्तांवर अशीच कारवाई करण्यात आली.

मनपाच्या उर्वरित पथकांनी पुढे हिमायत बाग, मौलाना आझाद महाविद्यालयासमोरील लहान मोठी दुकाने, हॉटेल, सलून, चहा कॉफी विक्रीच्या दुकानांवर कारवाई केली. ताज हॉटेलच्या समोरील एका खुल्या जागेवरील पत्रेही काढून टाकले. हडको कॉर्नर चौक ते जटवाडा रोड कॉर्नरपर्यंतची लहान मोठी अतिक्रमणे, संरक्षण भिंती, छोटी-छोटी दुकाने जमीनदोस्त करून रस्ता मोकळा करण्यात आला.

आज हर्सूल टी पॉइंट ते वसंतराव नाईक चौक१) मंगळवारी सकाळी महापालिका आणि पोलिस हर्सूल टी पॉइंट येथून कारवाईला सुरुवात करणार आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे पाडण्यात येतील.२) रस्ता ६० मीटर म्हणजेच २०० फूट रुंद आहे. मागील दोन दिवसांपासून या भागातील व्यापारी, मालमत्ताधारक आपली अतिक्रमणे स्वत:हून काढून घेत आहेत.३) कारवाईचा शेवट सिडको बसस्थानकातील वसंतराव नाईक चौकात करण्यात येणार आहे. मंगळवारीही पोलिस बंदोबस्त अधिक तैनात करण्यात येणार आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर