शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

कर्णकर्कश आवाजामुळे बुलेटस्वारांना पोलीस उपायुक्तांचा दणका, जागेवर बदलायला लावले सायलेन्सर

By सुमित डोळे | Updated: December 15, 2023 22:51 IST

छत्रपती संभाजीनगरात कारवाईसाठी स्वत: उपायुक्त रस्त्यावर

छत्रपती संभाजीनगर : गेल्या तीन दिवसांपासून शहर पोलिसांनी कर्कष आवाजाच्या सायलेन्सर लावलेल्या दुचाकीचालकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता उपायुक्त नितिन बगाटे स्वत: क्रांतीचौकात कारवाईसाठी रस्त्यावर उतरले. तेव्हा तासाभरात १८ बुलेटस्वारांवर कारवाई करत त्यांनी जागेवर ते बदलायला लावले. 

दुचाकींच्या कंपनीचे मूळ सायलेन्सर बदलून कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवण्याची क्रेझ गेल्या काही वर्षांत शहरात आली आहे. शहरात कॅनॉट प्लेस, निराला बाजार, औरंगपुरा, देवगिरी महाविद्यालय परिसर, छत्रपती महाविद्यालय परिसर, जालना रस्ता, मौलाना आझाद महाविद्यालय परिसर, हर्सूल, उस्मानपुरा, चिकलठाणा बाजार, पडेगाव, वाळूज परिसरात राजरोस बुलेट व अन्य स्पोर्ट दुचाकीचालक कर्कष आवाज करत दुचाकी दामटतात. आत्तापर्यंत पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने टवाळखोर दुचाकीचालकांचा आत्मविश्वास वाढला होता. त्यात निवडक बुलेटचालक सायलेन्सरमधून फटाके वाजवल्यासारखा आवाज करत सुसाट जातात. यामुळे आसपासच्या नागरिकांना मात्र अक्षरश: डोके, कानात वेदना होतात. याची गंभीर दखल घेत उपायुक्त नितिन बगाटे यांनी अशांवर कारवायांची माेहिमच हाती घेतली. 

जागेवर सायलेन्सर बदलायचेक्रांतीचौकात शुक्रवारी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत बगाटे यांनी क्रांतीचौकचे निरीक्षक संतोष पाटील, वाहतूक पोलिसां सोबत कारवाईला सुरूवात केली. तासाभरात त्यांनी १८ बुलेटस्वारांचे सायलेन्सर तपासून मॉडिफाय सायलेन्सर जागेवर काढायला लावत दंड ठोठावला. आत्तापर्यंत सिटीचौक पोलिसांनी २३, क्रांतीचौक १८, एमआयडिसी वाळुज १८, वेदांतनगर पोलिसांनी ८ अशा ८८ बुलेट, स्पोर्ऱ्स बाईक चालकांवर कारवाई करत १ लाख ७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे बगाटे यांनी सांगितले. या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद