शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पाचशे रुपयांसाठी तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीने अल्पवयीन मुलीचे केले होते लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 19:46 IST

सहा महिन्यांच्या गर्भवती पीडितेची पोलिसांत तक्रार

ठळक मुद्देसिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

औरंगाबाद : स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आलेल्या नगर जिल्ह्यातील तरुणाचा पाचशे रुपयांसाठी कब्रस्तानात नेऊन निर्घृण खून केल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या आरोपीने सहा महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. पीडितेला गर्भधारणा झाल्याने त्याचे पाप समोर आले आणि मंगळवारी सिटीचौक पोलीस ठाण्यात पीडितेने आरोपीविरोधात तक्रार नोंदविली. शहारुख खान फिरोज खान (२८, रा. जुनाबाजार), असे आरोपीचे नाव आहे.

सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार १६ वर्षीय पीडितेने शाळा सोडलेली आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी तिची आरोपीसोबत ओळख झाली होती. या ओळखीतून त्याने तिच्यासोबत मैत्री करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. यातून तिला गर्भधारणा राहिली. दरम्यान, ९ एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यातून स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आलेल्या अपंग तरुणाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आरोपीने मनपा कार्यालयाजवळील कब्रस्तानात नेऊन पाचशे रुपये लुटण्यासाठी त्याची हत्या केली होती.

या गुन्ह्यात पोलिसांनी त्यास अटक केली होती. तेव्हापासून आरोपी जेलमध्ये आहे. दरम्यान, पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने नातेवाईकांनी तिला दवाखान्यात नेल्यावर तिला गर्भधारणा झाल्याचे समोर आले. मंगळवारी तिने सिटीचौक पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार नोंदविली. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला. सहायक निरीक्षक सय्यद हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद