शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून लाच प्रकरणातील आरोपी पोलिसाची खंडपीठात निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 13:33 IST

सत्र न्यायालयाने आरोपी पोलिसास पाच वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड ठोठावला होता.

ठळक मुद्दे२२ जुलै २०१० रोजी धुळ्याजवळील सोनगीर फाट्याजवळ आरोपीने लाचेची मागणी केली शिक्षा झाल्यामुळे गृहविभागाने आरेफला २०१० मध्ये सेवेतून कमी केले होते. 

औरंगाबाद : आरोपी पोलीस आरेफ अली सय्यद याने ‘लाचेची मागणी केल्याचे’ सिद्ध न झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी आरेफला धुळ्याच्या सत्र न्यायालयाने ठोठावलेला पाच वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा रद्द केली. तसेच आरेफची निर्दोष मुक्तता केली. 

लाचेच्या गुन्ह्यात आरोपीने लाचेची ‘मागणी केली’ (डिमांड) आणि ‘लाच घेतली’(अ‍ॅक्सेप्टन्स) या दोन्ही बाबी सिद्ध होणे अनिवार्य आहेत. मात्र, प्रस्तुत प्रकरणात आरोपीने लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाले नसल्यामुळे खंडपीठाने त्याची निर्दोष मुक्तता केली. मूळ तक्रारदार हा मध्य प्रदेशातून तांदूळ आणि गहू आणून मुंबईच्या बाजारात विक्री करीत. २२ जुलै २०१० रोजी धुळ्याजवळील सोनगीर फाट्याजवळ पोलीस शिपाई आरेफने तक्रारदाराला अडवून ७० हजार रुपयांची मागणी केली, असा आरेफवर आरोप होता.  फिर्यादीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरेफला अटक केली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. दरम्यान, धुळ्याच्या सत्र न्यायालयाने आरेफला पाच वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड ठोठावला होता. शिक्षा झाल्यामुळे गृहविभागाने आरेफला  २०१० मध्ये सेवेतून कमी केले होते. 

आरेफने या शिक्षेविरुद्ध अ‍ॅड. नितीन एल. चौधरी यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अपील दाखल केले होते. सुनावणीवेळी अ‍ॅड. चौधरी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार लाचेच्या गुन्ह्यात आरोपीने लाचेची ‘मागणी केली’ आणि ‘लाच घेतली’ या दोन्ही बाबी सिद्ध होणे अनिवार्य असल्याचे आणि प्रस्तुत प्रकरणात मागणी केल्याचे सिद्ध झाले नसल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिस