मनोज मनोहर साळवे (२२, सातारा) असे आरोपीचे नाव आहे. सावरकर चौकातील मिलन मिठाई दुकान फोडून चोरट्याने गल्ल्यातील रोख २२ हजार ३०० रुपये पळविले. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपली होती. मंगळवारी सकाळी हा प्रकार लक्षात येताच दुकानदार राजाराम बिष्णोई यांनी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लगेच आरोपीला सातारा परिसरात पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरलेल्या रकमेपैकी २ हजार रुपये पोलिसांच्या स्वाधीन केले.
मिठाई दुकान फोडणाऱ्या आरोपीला अटक
By | Updated: November 26, 2020 04:13 IST