शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

नवीन जनगणनेनुसार महापालिकेला १२५ वाॅर्ड करावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 14:15 IST

महापालिकेतील नगरसेवकांची संख्या ११५ नगरसेवक एवढी असून, ती २०११ च्या जनगणनेनुसार ठरविण्यात आली आहे.

ठळक मुद्देनवी जनगणना २०२१ मध्येजुनी वाॅर्डरचना २०११ च्या जनगणनेनुसार 

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल; पण पुढील अडथळा २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेचा दिसतो आहे. सध्याची नगरसेवक संख्या २०११ च्या जनगणनेनुसार ठरली आहे. मात्र २०२१ च्या जनगणनेनुसार शहराची व सोबत नगरसेवकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे नव्याने वॉर्ड रचना करण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते, अशी भीती व्यक्त होते आहे. नवीन जनगणनेनुसार महापालिकेला १२५ वाॅर्ड तयार करावे लागतील. 

महापालिकेची एप्रिल २०२० मध्ये होणारी निवडणूक कोरोना संसर्गामुळे लांबणीवर पडली. महापालिकेच्या प्रभाग रचनेविषयी आक्षेप घेत माजी नगरसेवक समीर राजूरकर व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’चे आदेश दिले आहेत.  औरंगाबाद महापालिकेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याचा फटका राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकीला देखील बसण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या इतर महापालिकेच्या निवडणुका एकत्रित जाहीर केल्या होत्या.

मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण संपेल, असा अंदाज बांधून प्रशासन कामाला लागले आहे; परंतु  २०२१ मध्ये होणारी जनगणना अडथळा ठरण्याची शक्यता आहे. जनगणनेच्या तोंडावर निवडणुका कशा होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. महापालिकेतील नगरसेवकांची संख्या ११५ नगरसेवक एवढी असून, ती २०११ च्या जनगणनेनुसार ठरविण्यात आली आहे. नव्या जनगणनेत शहराची लोकसंख्या १५ लाखांपेक्षा जास्त नोंदविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे १२५ पर्यंत नगरसेवक संख्या जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रत्येक वाॅर्डातील मतदारांची संख्या किमान १५ ते १८ हजार होईल.

राज्य निवडणूक आयोगाचे निकषनिवडणूक आयोगाच्या निकषानुसार १२ लाख लोकसंख्येला १२० नगरसेवकांची संख्या निश्‍चित केली आहे. त्यानंतर पुढील ४० हजार लोकसंख्येसाठी एक नगरसेवक अशी संख्या ठरविण्यात आली आहे. २०११ मध्ये औरंगाबादची लोकसंख्या ११ लाख ७५ हजार एवढी होती, तर नगरसेवक संख्या ११३ एवढी होती. त्यानंतर सातारा-देवळाई भागाचा समावेश झाल्याने नगरसेवकांची संख्या दोनने वाढवून ११५ एवढी झाली. नवीन जनगणनेनुसार शहराची एकत्रित लोकसंख्या गृहीत धरून किमान १२५ वाॅर्ड होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद