शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

नकोशा बाळांसाठी जीवनदायी ठरतोय 'स्वीकार पाळणा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 19:22 IST

Aurangabad News शहरातील अनाथ बाळांचे संगोपन व त्यांना योग्य कुटुंबात दत्तक देणारी संस्था ‘साकार’ने ज्योतीनगरात संस्थेच्या कार्यालयाबाहेर पाळणा ठेवला आहे.

ठळक मुद्देमागील ६ वर्षांत अभागी मातांनी ५ बाळांना टाकले या पाळण्यात

औरंगाबाद : ज्योतीनगरात रस्त्याचा कडेला एक पाळणा येणारा- जाणारांचे लक्ष वेधत आहे. हा पाळणा येथे का ठेवला असेल, असा प्रश्न पडला नसेल तर नवल. मात्र, मागील सहा वर्षांत अभागी मातांनी ५ नकोशी बाळांचा त्याग करून त्यांना या पाळण्यात सोडले आहे. सध्या हा पाळणा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 

जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाला जगण्याचा अधिकार आहे. मात्र, काही माता अशा आहेत की, त्यांना आपल्या बाळाला नाईलाजाने त्यागण्याची वेळ येते. अनेकदा अशा बाळांना कुठे कचरा कुंडीत, तर कुठे निर्मनुष्य ठिकाणी, रस्त्याच्या कडेला टाकून दिले जाते किंवा त्यांची हत्या केली जाते. परिस्थिती कोणतीही असो; पण जन्माला आलेल्या बाळाला जगण्याचा हक्क आहे. 

यामुळेच शहरातील अनाथ बाळांचे संगोपन व त्यांना योग्य कुटुंबात दत्तक देणारी संस्था ‘साकार’ने ज्योतीनगरात संस्थेच्या कार्यालयाबाहेर पाळणा ठेवला आहे. तेथे ‘अनाथ तान्हुल्याचा स्वीकार पाळणा’ असे नाव दिले आहे. एखादी माता काही कारणास्तव आपल्या बाळचे पालन पोषण करण्यास असमर्थ असेल. त्याचा त्याग करायचा असेल, तर तिने भीती पोटी कोणत्याही असुरक्षित ठिकाणी बाळाला न सोडता, साकार संस्थेच्या या पाळण्यात आणून ठेवावे व तिथे असलेली बेल वाजवावी. अशी सूचना लिहिण्यात आली आहे.

१४ नोव्हेंबर २०१४ रोजी हा पाळणा ठेवण्यात आला आहे. आजपर्यंत ५ बाळांना या पाळण्यात ठेवून अभागी माता निघून गेल्या आहेत. यात प्रामुख्याने मुलींचा समावेश होता. या  पाळण्यामुळे त्या बाळांचा जीव वाचला व आज त्या बाळांना दत्तक विधानाद्वारे माता-पिता लाभले आहेत. पाळणा नसता, तर त्या बाळांचे काय झाले असते, याची कल्पना करवत नाही, असे या साकार संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पाळण्यात बाळ आले की, आपण पहिले त्या बाळास उचलून कार्यालयात नेले जाते. नंतर बालकल्याण समितीला व पोलिसांना कळविले जाते. त्या बाळाची घाटीमध्ये तपासणी करून बालकल्याण समितीच्या आदेशाने त्या बाळास प्रवेशित करून घेतले जाते. पाळणा जिथे आहे तिथे एक बेल बसविली आहे व लिहिले आहे की, बाळ पाळण्यात ठेवल्यावर बेल वाजवावी. बेल वाजली की, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघून मॅनेजर खात्री करून घेतात व बाळ  दिसल्यास आयाला बोलावून बाळ संस्थेत घेतले जाते, नंतर बालकल्याण समितीशी संपर्क साधला जातो.

बालकल्याण समितीच्या आदेशाने कार्यसेंट्रल आडोप्शन रिसोर्स अथोरिटीच्या नियमानुसार साकार संस्थेने पाळणा ठेवला आहे. कोणी पाळण्यात बाळ आणून टाकल्यानंतर बेल वाजल्यावर लगेच त्या बाळाला संस्थेत नेले जाते व त्याची माहिती पोलिसांना व बालकल्याण समितीला दिली जाते. त्यानंतर तपासणीसाठी त्या अनाथ बाळाला घाटीत नेले जाते. बालकल्याण समितीच्या आदेशाने त्या बाळाला संस्थेत प्रवेश दिला जातो व नंतर दत्तक विधानाद्वारे त्या बालकास हक्काचे आई- वडील मिळवून दिले जातात. -नीलिमा पांडे, उपाध्यक्ष, साकार

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsocial workerसमाजसेवक