शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल हबची उभारणी वेगात; औरंगाबादहून वर्षभराने राज्यभरात होणार औषधीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 19:27 IST

औषधी खरेदीनंतर संपूर्ण राज्यात वितरित करणे, हे या भांडाराच्या माध्यमातून होणार आहे.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद :औरंगाबादेतील करमाड येथे उभारण्यात येत असलेला मेडिकल हब म्हणजे राज्यस्तरीय औषधी भांडाराचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. याठिकाणी औषधी भांडारासह गेस्ट हाउस, प्रशिक्षण केंद्राचीही इमारत उभी राहिली आहे. विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच वर्षभराने औरंगाबादहून राज्यभर औषधीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

आरोग्य विभागाने २०११ पासून ई-निविदा पद्धतीने औषधी साहित्य, सामुग्रीच्या मध्यवर्ती खरेदीप्रणालीचा अवलंब सुरू केला. त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या मध्यवर्ती भागात राज्यस्तरीय औषधी भांडार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी विविध शहरांचे, गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. अखेर औरंगाबादेतील करमाड येथे औषधी भांडार उभारण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यभरात सध्या ‘हाफकिन’कडून औषधी खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करमाड येथे उभारण्यात येणारे राज्यस्तरीय औषध भांडार गुंडाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु या औषधी भांडाराची नियोजनाप्रमाणे उभारणी होणार आहे. औषधी खरेदीनंतर संपूर्ण राज्यात वितरित करणे, हे या भांडाराच्या माध्यमातून होणार आहे. २०२१ मध्ये बांधकामाला सुरुवात झाली. आजघडीला ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. औषधी भांडाराच्या इमारतीसह प्रशिक्षण केंद्र आणि गेस्ट हाउसची स्वतंत्र इमारत याठिकाणी उभारण्यात आली आहे.

१२ ते १५ तासांत पोहोचतील औषधीऔरंगाबाद राज्याच्या केंद्रस्थानी आहे. औषधी १२ ते १५ तासांच्या आत कोणत्याही शहरांत पोहोचू शकतात. नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना वेगाने जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग झाला आहे. या मार्गाशी औरंगाबाद शहरही जोडले आहे. त्यामुळे औषधी भांडारातून नागपूर आणि मुंबईसह राज्यभरात काही तासांत औषधीपुरवठा शक्य होणार आहे.

विद्युतीकरणाचे काम शिल्लकजवळपास ८० टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे. विद्युतीकरण आणि फर्निचरचे काम शिल्लक आहे. त्यासाठी ३.७९ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आगामी वर्षभरात काम पूर्ण होईल, यादृष्टीने प्रयत्न आहे.-डाॅ. सुनीता गोल्हाईत, आरोग्य उपसंचालक

...असे आहे औषधी भांडार- साडेबारा एकर जागा.- औषधी भांडाराची इमारत.- जी प्लस वन प्रशिक्षण केंद्रांची इमारत.- जी प्लस दोन मजली गेस्ट हाउसची इमारत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMedicalवैद्यकीय