शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ACB Raid: थकीत बिल काढण्यासाठी १० हजारांची लाच घेताना ग्रामसेवक रंगेहाथ अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:47 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत वैजापूर तालुक्यातील भायगावचा ग्रामसेवक अडकला

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील भायगाव ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक विजयकुमार क्षीरसागरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई आज, बुधवारी दुपारी जरूळ फाटा येथे सापळा रचून करण्यात आली.

तक्रारदार हे भायगावचे उपसरपंच असून त्यांच्या गावी स्मशानभूमीचे काम जनसुविधा योजनेअंतर्गत पूर्ण झाले आहे. या कामासाठी मंजूर झालेल्या ६ लाख ९६ हजार रुपयांच्या बिलांपैकी उर्वरित ९४ हजार रुपये अदा करण्यासाठी आवश्यक एनओसी त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये सादर केली होती. मात्र, ग्रामसेवक विजयकुमार क्षीरसागर याने या उर्वरित रकमेसाठी चेकवर सही करण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदार यांनी लाच देण्यास नकार देत थेट छत्रपती संभाजीनगरलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार १७ जून रोजी प्राथमिक पडताळणी करण्यात आली. त्यानंतर १८ जून रोजी पंचासह झालेल्या चर्चेत आरोपीने तडजोडीत १० हजार रुपयांची लाच मागीतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज तक्रारदारांनी ग्रामसेवक क्षीरसागरने सांगितल्यानुसार जरूळ फाट्यावरील चैतन्य टी हाऊस येथे भेट दिली. क्षीरसागरने तक्रारदाराकडून दहा हजार रुपये पंचसाक्षीदारांसमक्ष स्वीकारले. त्याच वेळी एसीबीच्या पथकाने कारवाई करत आरोपीला लाचेसह अटक केली.

कारवाईदरम्यान आरोपीकडून एक मोबाईल, पाकीट, ओळखपत्रे, ७०० रु रोख रक्कम व दुचाकी चावी जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव, पो. उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संगीता पाटील यांच्या नेतृत्वात पोह. राजेंद्र सिनकर, पोअं. विलास चव्हाण आणि सी.एन. बागुल यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागgram panchayatग्राम पंचायतchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर