शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर मावस भावाचा अत्याचार; काकानेही केला विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 12:21 IST

अत्याचार करणारा मावस भाऊ आणि विनयभंग करणाऱ्या काकावर गुन्हा

औरंगाबाद : प्रेमाच्या आणाभाका घेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा तिचा प्रियकर महेश बागुल (नाव बदलले आहे) याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सत्र न्यायाधीश ए.एस. खडसे यांनी मंगळवारी दिले.या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मावस भावासह तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग करणाऱ्या मावस काकांवर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१७ वर्षांच्या पीडितेच्या आईने फिर्याद दिल्यानुसार, १८ जुलै रोजी पीडिता बेपत्ता झाली होती. तपास सुरू असताना २५ जुलै रोजी ती पोलीस ठाण्यात हजर झाली. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, २०१८ मध्ये ती ९ वीत असताना तिची आरोपी महेश याच्याशी ओळख झाली व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. २०१८ मध्येच मावस काकाने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला होता.

एप्रिल २०१९ मध्ये आरोपी महेशने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. मे २०२२ मध्ये पीडिता बहीण व मावस भावांसह गच्चीवर झोपली असताना मावसभावाने पीडितेशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. १४ जून रोजी मावस भावाने पीडितेला जलजिरा पिण्यासाठी दिला असता तिला चक्कर आली. त्यानंतर मावसभावाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या सर्व घटनांमुळे पीडिता मानसिकरीत्या खचली होती. त्यामुळे १८ जुलै रोजी ती घरातून निघून गेली. 

तेथे महेश तिला घेण्यासाठी गेला. दोघे बदलापूर (जि. ठाणे) येथे त्याच्या काकाकडे गेले. २२ जुलै रोजी त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. मुकुंदवाडी पोलीस तिचा शोध घेत असताना महेशच्या काकूने तिला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आणले. आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, सहायक लोकअभियोक्ता अरविंद बागुल यांनी आरोपीची पोलीस कोठडी मंजूर करून घेतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद