शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

औरंगाबादमधील सुमारे २ हजार उद्योगांवर मंदीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 06:16 IST

जीएसटीचा फटका, दुष्काळाची छाया : लाखांहून अधिक कामगार, कर्मचाऱ्यांवर गंडांतराची भीती

विकास राऊत 

औरंगाबाद : येथील वाळूज, चिकलठाणा आणि शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील सुमारे २ हजार एमएसएमई (सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग) दुष्काळ, जीएसटी व मंदीच्या संकटामुळे त्रस्त आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास लाखाहून अधिक रोजगारांवर गंडांतर येईल, अशी भीती उद्योग वर्तुळातून व्यक्त होत आहे.

औरंगाबादमधील औद्योगिक वसाहतीची आॅटोमोबाइल हब म्हणून ओळख आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांच्या दुचाकी, चार चाकींसाठीच्या सुट्या भागांचे येथे उत्पादन होते. दिल्ली, गुजरात, दक्षिण भारतातील उद्योगांना येथून सुटे भाग पुरविले जातात. मात्र काही महिन्यांपासून वाहनांच्या विक्रीतील घट, जीएसटीचा बोजा, दुष्काळजन्य परिस्थितीमुळे वाहन उद्योगांवर मंदीचे ढग दाट होत आहेत. त्यामुळे विशेषत: वाळूज वसाहतीत वाहनांच्या सुट्या भागांचे उत्पादन करणाºया उद्योगांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. कामगारांच्या शिफ्ट कमी झाल्या आहेत.

मसिआचे माजी अध्यक्ष किशोर राठी म्हणाले, औरंगाबादमधील ६० ते ६५ टक्के उद्योगांतून आॅटोमोबाइल्स क्षेत्रास लागणाºया सुट्या भागांचे उत्पादन होते. सध्या संपूर्ण आॅटोमोबाइल इंडस्ट्री त्रस्त आहे. मंदीमुळे उत्पादनाचे प्रमाण कमीझाले आहे. उद्योगांच्या शिफ्ट पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. या दोन हजार उद्योगांत सुमारे दीड ते दोन लाखांच्या आसपास कामगार असतील. स्कोडा, होंडा, टाटा, बीएमडब्ल्यू, व्हॉल्व्हो, मारुती यांच्या उत्पादनासाठी लागणारे सुटे भाग औरंगाबादमध्येच तयार होतात. जीएसटीचे दर सरसकट करण्याची मागणी केंद्राकडे सुरू आहे, त्यावर सरकार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष आहे.

अपडेट होण्यात अनेक अडचणीकेंद्र सरकारने ‘इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी २०२२’साठी पाऊल उचलले. त्यामुळे बीएस-६ वाहनांच्या उत्पादनासाठी त्याच प्रकारच्या सुट्या भागांचे उत्पादन करावे लागेल. एमएसएमईला याचा मोठा फटका बसणार आहे. सध्याची युनिट पूर्णत: अपडेट करावी लागतील. मनुष्यबळाला प्रशिक्षित करावे लागेल. हे आर्थिक आव्हान एमएसएमईला पेलणे शक्य होईल की नाही, याबाबत साशंकता असल्याचे किशोर राठी यांनी सांगितले.

टॅग्स :Employeeकर्मचारी