शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अब्दुल सत्तार ठरले शिंदे सरकारचे पहिले लाभार्थी; सिल्लोडमधील सूतगिरणीला १५ कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 12:30 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना सत्तार यांनी सिल्लोडमध्ये २०० कोटींच्या आसपासचा निधी एक हाती मिळविला.

औरंगाबाद : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले लाभार्थी आ. अब्दुल सत्तार ठरले आहेत. त्यांच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात वस्त्रोगास चालना देण्यासाठी प्रस्तावित सूतगिरणीचा मार्ग मोकळा झाला आहे. नॅशनल सहकारी सूतगिरणीला शासकीय भागभांडवल म्हणून ८१ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या अंतर्गत पहिला टप्पा म्हणून १५ कोटी २६ लाख रुपयांचे शासकीय भागभांडवल देण्याचा निर्णयदेखील झाला आहे. वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया यांनी शासननिर्णयानुसार आ. सत्तार यांना पहिल्या टप्प्यातील निधी मिळण्याचा अध्यादेश सुपूर्द केला.

या निर्णयामुळे सिल्लोडमध्ये नॅशनल सूतगिरणी उभारणीस गती मिळणार आहे. महिन्याभरात सूतगिरणीसाठी जागा निश्चित होईल. त्यानंतर तीन महिन्यांत आर्थिक सक्षमतेच्या अहवालासह अटी व शर्तींसह समभाग भांडवल तपासले जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना सत्तार यांनी सिल्लोडमध्ये २०० कोटींच्या आसपासचा निधी एक हाती मिळविला. त्यातूनच त्यांची शिंदेसोबत जवळीक वाढली. गेल्या आठवड्यात मुंबईत शिंदे यांच्यासाठी शक्तिप्रदर्शन करताना त्यांनी सूतगिरणीच्या मुद्द्याला हवा दिली, मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने त्यांचा प्रस्ताव मंजूर केला. अशा पद्धतीने शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या पंधरवड्यात १५ कोटी ८१ लाखांचा निधी पदरात पाडून घेणारे आ. सत्तार हे पहिले लाभार्थी ठरले आहेत.

काँग्रेस ते शिवसेना मार्गे शिंदे सेना२०१९ मध्ये काँग्रेसला सोडल्यानंतर आ. सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्याची तयारी केली; परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महसूल राज्यमंत्रिपदी संधी मिळाल्याने अडीच वर्षे मातोश्री आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आपले दैवत असल्याचे जाहीरपणे सांगितले; परंतु मुख्यमंत्री शिंदे यांच्या ते अधिक जवळ गेले.

१०७ गावांसाठी वाॅटर ग्रीडला मंजुरीसिल्लोड तालुक्यातील १०७ गावांसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ६६५ कोटी रुपयांच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत वॉटर ग्रीड पाणीपुरवठा योजनेस देखील प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील ही दुसरी वॉटर ग्रीड योजना आहे. पहिली वाॅटर ग्रीड योजना पैठण तालुक्यात मंजूर झाली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAbdul Sattarअब्दुल सत्तारEknath Shindeएकनाथ शिंदे