शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

अबब...! छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर धावते १२.५० लाखांची सायकल

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 3, 2024 13:32 IST

जागतिक सायकल दिवस: लक्झरी कारच्या किमतीत सायकल, सर्वसामान्य ग्राहकही खरेदीत पुढे

छत्रपती संभाजीनगर : सर्वांत स्वस्त वाहन, प्रदूषणमुक्त सवारी म्हणून सायकलीकडे पाहिले जाते. एकेकाळी गरिबाचे वाहन म्हणून लोकप्रिय ठरलेल्या सायकलीला आता ‘अच्छे दिन’ आले आहेत. ती आता महागड्या कारशी स्पर्धा करू लागली आहे. शहरात लक्झरी कारच्या किमतीत सायकल विकत आहे. १२ लाख ५० हजार रुपयांची सायकल शहरात विकली जात आहे. अशा महागड्या सायकली खरेदी करणारा हौशी वर्गही येथे आहे. म्हणूनच तर आजघडीला एक-दोन नव्हे, तर अशा तब्बल १३ ते १५ सायकली शहरात चालविल्या जात आहेत.

सायकलीची ‘रोड बाइक’ नवीन ओळखसुपर बाइक्स आणि सुपर कारच्या जमान्यात सायकलही मागे राहिली नाही. सायकलही रोड बाइक म्हणून नवीन ओळख मिळाली आहे. प्रगत तंत्रज्ञानयुक्त सायकली बाजारात दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे सुपर कार बनविणाऱ्या कंपन्यांनी या ‘रोड बाइक’ तयार केली आहे. १२.५० लाख रुपयांत मिळणारी सायकल ९५ टक्के अतिशय मजबूत कार्बन फायबरपासून बनलेली आहे. तिचे वजनही केवळ ५ ते ६ किलो आहे. यामुळे या सायकली वजनाने अत्यंत हलकी आहे. सीट, हँडलसह इतर सर्व भाग देखील कार्बन फायबरचे आहेत. हायड्रोलिक डिस्क ब्रेक सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक्स गिअर सिस्टीम अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. रोड बाइक ३ लाखांपासून ते १२.५० लाखांपर्यंत शहरात विकत आहेत.

ई-सायकल का जमाना है भाईई-बाइक, इ-कारसोबत आता इ-सायकलचाही जमाना आला आहे. बॅटरी चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात, तर एकदा चार्ज झाली की, सायकल ३० कि.मी.पर्यंत जाऊ शकते. जर पँडलचा वापर केला तर ४० कि.मी.पर्यंतही सायकलिंग करता येते. २५ हजारांपासून ते ६४ हजारांपर्यंतच्या ई-सायकल शहरात विकल्या जात आहेत.

दर महिनाला विकतात ९०० सायकलीशहरात महिनाला ८०० ते ९०० सायकली विकल्या जातात. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर सायकलीच्या विक्रीत १५ ते २० टक्क्याने वाढ होते. जे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत भाग घेतात

सर्वसामान्य ग्राहकही खरेदीत पुढेते ‘रोड बाइक’ सायकल खरेदी करतात. आता ई-सायकल सर्वसामान्य ग्राहकही खरेदी करू लागले आहेत.- निखिल मिसाळ, सायकल वितरक

किती टक्के लोक, कोणत्या किमतीदरम्यान सायकल खरेदी करतातखरेदीदारांची टक्केवारी किंमत१) ६० टक्के ---------- ३ हजार ते ३० हजार रु.२) ३० टक्के-----------३५ हजार ते दीड लाख रु.३) १० टक्के----------- दीड लाखाच्या वरील किमती.

टॅग्स :CyclingसायकलिंगAurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण