शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अबब... चिमुकल्याच्या गळ्यात ५ सें. मी.ची तार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 08:32 IST

लहान मुले खेळत खेळत काय गिळतील? काय नाकात - कानात घालतील, याचा नेम नाही. दौलताबाद येथील ६ वर्षीय चिमुकल्याने कपडे वाळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिमट्याची ५ से. मी. लांबीची तारच गिळली.

औरंगाबाद : लहान मुले खेळत खेळत काय गिळतील? काय नाकात - कानात घालतील, याचा नेम नाही. दौलताबाद येथील ६ वर्षीय चिमुकल्याने कपडे वाळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिमट्याची ५ से. मी. लांबीची तारच गिळली. ही तार अन्ननलिकेत अडकली. परिणामी, अन्ननलिका फाटण्याचा धोका होता. अशा अत्यवस्थ अवस्थेत दाखल झालेल्या या बालकाच्या अन्ननलिकेत अडकलेली तार दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करून काढून जीव वाचविण्याची किमया घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी केली.

दौलताबाद येथील रहिवासी असलेल्या बालकाला घेऊन पालकांनी रविवारी घाटीत धाव घेतली. क्षणाचाही विलंब न करता डाॅक्टरांनी अन्ननलिकेत अडकलेली तार काढली. या मुलाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. कान - नाक - घसा विभागप्रमुख डाॅ. सुनील देशमुख यांनी ही शस्त्रक्रिया केली. डाॅ. प्रशांत केचे, डाॅ. सोनाली जटाळे, डाॅ. शैलेश निकम, भूलतज्ज्ञ डाॅ. गायत्री तडवळकर, डाॅ. अंकिता राठी यांच्यासह परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी मदत केली. अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विजय कल्याणकर यांनी विभागातील डाॅक्टरांची याबद्दल प्रशंसा केली. 

मुलाने काही गिळल्यानंतर सर्वांत आधी काय कराल?मुलांनी काही गिळल्यानंतर अनेकजण पाठीत, छातीवर मारतात. परंतु, असे करू नये. मुलांनी काही गिळल्याचे लक्षात येताच तत्काळ जवळच्या कान - नाक - घसातज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. लहान मुले खेळताना तोंडात, कानात काही वस्तू टाकत असतील, तर वेळीच त्यांना रोखले पाहिजे, अन्यथा  शस्त्रक्रियेची वेळ येऊ शकते. लहान मुलांना बिया असणारी फळे देता कामा नये अथवा बिया काढून फळ दिले पाहिजे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल