शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हत्यार बनविणाऱ्या कारखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:29 IST

शहरात सलग दोन दिवस कुरिअरच्या पार्सलमधून तलवारी तसेच जंबिया, चॉपर अशी घातक शस्त्रे गुन्हे शाखेने पकडली. शुक्रवारी बिडकीन पोलिसांनी चार ठिकाणी टाकलेल्या धाडसत्रात धारदार तलवारी, कुकरी, चाकू इत्यादी घातक शस्त्रे तयार करण्याच्या साहित्यासह चार जणांना ताब्यात घेतले. चितेगाव, केसापुरी, फारोळा व आलाना तांडा या गावांत गुरुवारी व शुक्रवारी सकाळी बिडकीन पोलिसांनी छापे मारून आरोपींना जेरबंद केले.

ठळक मुद्देचार आरोपींना अटक : चितेगाव, केसापुरी, फारोळा, आलाना तांडा येथे छापे; शस्त्रे बनविण्याच्या साहित्यासह चौघांना घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचितेगाव : शहरात सलग दोन दिवस कुरिअरच्या पार्सलमधून तलवारी तसेच जंबिया, चॉपर अशी घातक शस्त्रे गुन्हे शाखेने पकडली. शुक्रवारी बिडकीन पोलिसांनी चार ठिकाणी टाकलेल्या धाडसत्रात धारदार तलवारी, कुकरी, चाकू इत्यादी घातक शस्त्रे तयार करण्याच्या साहित्यासह चार जणांना ताब्यात घेतले. चितेगाव, केसापुरी, फारोळा व आलाना तांडा या गावांत गुरुवारी व शुक्रवारी सकाळी बिडकीन पोलिसांनी छापे मारून आरोपींना जेरबंद केले.औरंगाबाद शहरात झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी शहरात अनेक ठिकाणी तलवारी जप्त केल्या आहेत. त्यानंतर एका आॅनलाईन कंपनीकडून शहरात तलवारी व धारदार शस्त्रे पुरविले जात असल्याचे नुकतेच समोर आले आहे. आता औरंगाबाद ग्रामीण पोलीस सावध झाले असून, ग्रामीण पोलिसांनी शस्त्र बाळगत असलेल्या लोकांवर कारवाई सुरू केली आहे. बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांना खबºयाकडून मिळालेल्या माहितीनुसार चितेगाव, केसापुरी, फारोळा व आलाना तांडा या गावांत काही लोक बेकायदेशीररीत्या आपल्या घरामध्ये तलवारी बाळगत आहेत, अशी माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार बिडकीन पोलिसांनी पाळत ठेवून धाडसत्र सुरू केले असता वरील चार ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत ५ तलवारी, १ कुकरी, ६ चाकू व धारदार शस्त्रे तयार करण्याचे साहित्य, असा एकूण १८ हजार १५० रुपये किमतीच मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.याप्रकरणी बिडकीन पोलिसांनी दत्ता महादू बोचकरी (२८, रा. चितेगाव, ता. पैठण), सतीश श्रीमंत सरोदे (२३, रा. केसापुरी, ता. पैठण), बबन लिंबाजी कुलाल (२३, रा. फारोळा, ता. पैठण), संतोषसिंग करमसिंग टाक (४५, रा. आलाना तांडा, ता.जि. औरंगाबाद) यांच्या घराच्या झडतीत धारदार शस्त्रे मिळून आली. तसेच वरील लोकांनी कुणाला शस्त्रे पुरविली आहेत का याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात शस्त्रे मिळून आल्याने तालुकाभर एकच खळबळ उडाली आहे. पकडलेले आरोपी हे स्वत: शस्त्र बनवीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या लोकांनी अनेकांना शस्त्रे तयार करून विकली असल्याचा संशय पोलिसांना आल्यामुळे त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.कारखान्यात कोयते, चाकू बनवून विक्रीसंतोष टाक याच्या आलाना कंपनीजवळ एका बंद हॉटेलमध्ये हा कारखाना सुरू असून, त्याच्याकडून हत्यार बनविण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. त्यांनी किती हत्यारे तयार करून कुणाला विक्री केले, याचा शोध पोलीस घेत आहेत.पथकाने मारले चार गावांत छापेतलवारीचे लोण परिसरातील खेड्यांतही पसरू लागले असून, गुन्हेगारी कारवाईत त्यांचा काही सहभाग आहे काय, तलवारी आणल्या कुठून, अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी बिडकीन पोलिसांनी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, उपनिरीक्षक विठ्ठल आईटवार, दीपक देशमुख, राजू चव्हाण, सुनील सुरासे, तुळशीराम गायकवाड, संतोष तोडकर, गणेश गंगावणे, कविता रगडे यांनी केली आहे.