शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकाजवळ तरुणाला धमकावून लुटले, मदतीला आलेलाही निघाला चोरट्यांचाच साथीदार

By सुमित डोळे | Updated: December 4, 2023 20:32 IST

दोघांनी लुटले, तिसऱ्याने केला मदतीचा बहाणा

छत्रपती संभाजीनगर : घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत असलेल्या तरुणाला दोघांनी धमकावून लुटले. रविवारी सायंकाळी रहदारीच्या वेळी सिडको बसस्थानकाजवळ गुंडांनी ही हिंमत केली. यात तरुणाचा मोबाईल व ३ हजार ६०० रुपये चोरट्यांनी हिसकावून नेले.

अप्पासाहेब दाभाडे (३५, रा. धोपटेश्वर, बदनापुर) हे महावितरण मध्ये वरीष्ठ तंत्रज्ञ आहेत. ३ डिसेंबर रोजी मिलकॉर्नर जवळील कार्यालयात कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणूकीसाठी ते शहरात आले होते. मतदान करुन ते घरी जाण्यासाठी निघाले. सायंकाळी ७ वाजता सिडको चौकातील उड्डाणपुलाजवळ बसची वाट पाहत थांबले. तेव्हा लांब केस असलेला तरुण त्यांच्याकडे गेला. 'तुला कुठे जायचे आहे, मी सोडताे' असे म्हणत त्याने अचानक अप्पासाहेब यांची कॉलर पकडली. बळजबरीने ओढून उभे करत मोबाईल हिसकावून घेतला. त्याच्या दुसऱ्या साथीदाराने पळत येत रोख असलेले वॉलेट काढून घेतले.

मदतीचा बहाणा, गुंडांचाच साथीदारदोघे लुटून निघून गेले व तेवढ्यात एक दुचाकीस्वार तेथे गेला. तुमचा मोबाईल, वॉलेट मी मिळवून देतो, असे म्हणत तो समोर गेला. परंतू लुटणारे दोघे त्याच्याच दुचाकीवर बसून निघून गेले. घटनेनंतर त्यांनी थेट एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठले. यापूर्वी देखील सायंकाळ नंतर सिडको चौक, बसस्थानक परिसरात लुटमारीच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद