शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुलाची रेल्वेसमोर उडी; युवकाचा मृत्यू, विवाहिता बचावली, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 11:22 IST

युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर युवती जखमी झाली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.   

छत्रपती संभाजीनगर : एक महिन्यापूर्वी विवाह झालेल्या युवतीने प्रियकरासोबत ठाण्यातून पळ काढला. पुण्यातून हे जोडपे छत्रपती संभाजीनगरात मंगळवारी सायंकाळी दाखल झाले. एकनाथनगर भागातील रेल्वेसमोर रात्री ९.३० वाजता युवकाने उडी घेतली. त्याच्यापाठोपाठ युवतीनेही उडी घेण्याचा प्रयत्न केला. युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर युवती जखमी झाली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.   

उमेश मोहन तारू (२३, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव), असे मृत प्रियकराचे, तर पूजा विनोद तायडे (१९, रा. हनुमानकुंडनगर, ता. मुक्ताईनगर), असे युवतीचे नाव आहे. उमेश व पूजा यांचे  प्रेमसंबंध होते. त्यास दोन्ही कुटुंबांचा विरोध होता. पूजाचा विवाह मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील युवकासोबत २८ फेब्रुवारी २०२३ रोजी झाला. पूजाचा पती ठाण्यामध्ये एका खासगी कंपनीत नोकरीला आहे.

दोन दिवसांपूर्वी ती ठाण्यात नवऱ्याकडे गेली. उमेश तिला भेटण्यासाठी ठाण्यात गेला. तेथून दोघे पळून पुण्यात आले. त्यानंतर दोघे छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी सायंकाळी पोहोचले. दोघांच्या कुटुंबांना ते सोबत असल्याचे समजल्यानंतर त्यांचे  फोन सुरू झाले. अशातच पूजा उमेशच्या मोबाइलवरून त्याच्या भावाशी बोलत असतानाच उमेशने रेल्वेसमोर उडी घेतली. 

ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल     

पूजाच्या पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार मंगळवारी ठाण्यातील एका पोलिस ठाण्यात नोंदवली. पूजाच्या विवाहास मंगळवारी एक महिना पूर्ण झाला. बरोबर एका महिन्यानंतरच तिच्या प्रियकराने आत्महत्या केली. पूजा सुदैवाने बचावली.

टॅग्स :railwayरेल्वेDeathमृत्यू