शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यानंतर पुन्हा बरसला पाऊस; आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 11:54 IST

मुरू चक्रीवादळाचा परिणाम, ९ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज

औरंगाबाद : सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पाऊस थांबला होता. नवरात्राच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्री व गुरुवारी दुपारी शहरात हजेरी लावली.पूर्व आशियातील मुरू चक्रीवादळाचा हा परिणाम असून, ९ ऑक्टोबरपर्यंत त्याची तीव्रता राहणार आहे. त्यामुळे पावसाचे आगमन झाल्याचे हवामान अभ्यासक सांगत आहेत. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात १.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्याचे वार्षिक सरासरी (३० सप्टेंबर पर्यंतचे) पर्जन्यमान ५८१.७ मिमी आहे. या तुलनेत आतापर्यंत ६६४ मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत ५९२ मिमी पाऊस आजवर होणे अपेक्षित होते. ११२ टक्के हा पाऊस आहे.शहरात ११.२ मिमी गुरुवारी दिवसभरात शहर व परिसरात ११.१ मिमी पावसाची नोंद झाली. सुरुवातीला काही भागात पाऊस झाला. त्यानंतर पूर्ण शहरात हलक्या, मध्यम व नंतर जोरदार सरी बरसल्या. सकाळपासून वातावरणात दमटपणा होता. दुपारनंतर वातावरण बदलले आणि पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. हर्सूल, बंबाटनगर, राजनगर-मुकुंदवाडी, सातारा-देवळाईतील रस्ते नसलेल्या भागात चिखल झाला. नागरिकांना चिखलातून वाट काढत घरापर्यंत जावे लागले.

वादळाची तीव्रता १३ ऑक्टोबरपर्यंत९ ऑक्टोबरपर्यंत पाऊस बरसणार असल्याचे भाकीत हवामान अभ्यास श्रीनिवास औंधकर यांनी वर्तविले. मुरू नावाच्या जपान व पूर्व आशियातील चक्रीवादळाचा हा परिणाम आहे. १३ ऑक्टोबरपर्यंत या वादळाची तीव्रता राहणार आहे. ९ ऑक्टोबरपर्यंत जास्त तीव्रता असणार आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देशातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस