शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

लिजहोल्डचे फ्री होल्ड करून घेणे ही ‘ऐच्छिक’ योजना; रेडीरेकनर दरानुसार रक्कम भरावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 19:48 IST

सिडकोच्या मालमत्तेसाठी भाडेपट्ट्याच्या अटीनुसार अनर्जित उत्पन्नाचा भरणा करणे आवश्यक नाही. अशा मालमत्ता फ्री होल्ड करण्यासाठी टेलिस्कोपिक पद्धतीने गणना केली जाईल.

छत्रपती संभाजीनगर : सिडकोतील निवासी मालमत्ता लिजहोल्डमधून (भाडेकरार) फ्रीहोल्ड (स्वमालकी) करण्यासाठी शासनाने गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्यानंतर शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी निर्णयाचा अध्यादेश काढण्यात आला. यामध्ये ही एक ऐच्छिक येाजना असून, जर मालमत्ताधारक ताबा हक्कामध्ये फ्री होल्ड करून घेण्यासाठी पुढे आले नाहीत किंवा विक्री दरम्यान लिज टू फ्री होल्ड करण्यासाठी अर्ज करीत नसतील, तर त्या मालमत्ताधारकाचा भाडेकरार सिडकोच्या अटीनुसार कायम राहणार आहे. भूखंडाच्या क्षेत्रफळानुसार चालू रेडीरेकनर दरानुसार रक्कम सिडकोला भरल्यानंतर सिडकोने भाडेकरारावर दिलेले भूखंड स्वमालकीचे होतील.

सिडकोच्या मालमत्तेसाठी भाडेपट्ट्याच्या अटीनुसार अनर्जित उत्पन्नाचा भरणा करणे आवश्यक नाही. अशा मालमत्ता फ्री होल्ड करण्यासाठी टेलिस्कोपिक पद्धतीने गणना केली जाईल. उदाहरणादाखल सांगायचे म्हटले, तर भूखंडाचे क्षेत्रफळ १५० चौरस मीटर असेल आणि भाडेपट्ट्याचा कालावधी ६० वर्षांचा असेल, तर पहिल्या २५ चौरस मीटरसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पुढील २५ चौरस मीटरसाठी १ टक्का शुल्क आकारले जाईल. त्यापुढच्या ५० चौरस मीटरसाठी २.५ टक्के शुल्क आणि उर्वरित ५० चौरस मीटरसाठी १० टक्के शुल्क आकारले जाईल, म्हणजेच सुमारे १५०० चाैरस फुटांचा भूखंड भाडेकरारावरून स्वमालकीचा करून घ्यायाचा असल्यास १३.५ टक्के शुल्क विद्यमान रेडीरेकनरच्या दरानुसार लागेल. ही सगळी रक्कम एकरकमी भरावी लागेल. दरम्यान विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल) तरतुदीनुसार मालकी हक्काने रुपांतरीत करण्यास आलेल्या जमिनीच्या मूळ करारात नमूद एफएसआसय, जमीन वापर, अधिकच्या एफएसआयचा आकारण्यात येणाऱ्या महसूलाचे वाटप सिडको, स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाच्या प्रचलित पद्धतीने सुरू राहील.

भूखंडांचे क्षेत्रफळ..........३० वर्षांचा भाडेकरार..........३० ते ९० वर्षांचा भाडेकरार......९० वर्षांवरील भाडेकरार२५ चौरस मीटर............१ टक्के रक्कम लागेल......०० टक्के रक्कम लागेल.................०० टक्के रक्कम लागेल२६ ते ५० चौरस मीटर...२ टक्के रक्कम लागेल ...........१ टक्के रक्कम लागेल.......... ०.५ रक्कम लागेल१०१ चौरस मीटर पुढे ....२० टक्के रक्कम लागेल........१० टक्के रक्कम लागेल..........५ टक्के रक्कम लागेल

भूखंड वाटप व दर प्रक्रियेसाठी समिती...व्यवस्थापकीय संचालक, सिडको समितीचे अध्यक्ष असतील. तर, पीएमआरडीए, एनएमआरडीए नाशिक व नागपूर, छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त सदस्य असतील. सिडकोचे मुख्य नियोजनकर सदस्यव सचिव असतील. या सर्व प्राधिकरणांना जमीन विनियोग विनियमनच्या तरतुदीनुसार निवासी भूखंड मालकी हक्काने वाटप करण्यासाठी सर्व नियमांमध्ये सुधारणा करावी लागेल.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcidcoसिडको