शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

स्थापत्यशैलीचा अनोखा नजारा; वेरूळ लेणीतील गौतम बुद्धांच्या मूर्तीवर किरणोत्सव सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 20:09 IST

किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने अखेर खुलताबाद पोलीसांना लेणी परिसरात बंदोबस्त तैनात करावा लागला.

खुलताबाद: जगप्रसिद्ध वेरूळ दहा नंबरच्या लेणीतील तथागत गौतम बौद्धांच्या मूर्तीवर किरणोत्सव सोहळा हजारो पर्यटकासह भाविकांना आज सोमवार दि १० रोजी सांयकाळी ४:१० मिनिटांनी अनुभवयास मिळाला. सदरील सोहळा बघण्यासाठी हजारो पर्यटक व भाविकांनी दुपार पासूनच लेणी परिसरात गर्दी केली होती. 

स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण चौतीस लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध धर्मिय लेण्या आहेत. तर यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार आहेत.  यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीमध्ये सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे येत असतात. दरवर्षी १० मार्च रोजी सूर्यकिरणे तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरती येतात. आगामी पाच ते सहा दिवस हा सोहळा भाविकांसह पर्यटकांना अनुभवता येईल. 

महाराष्ट्रातील बौद्ध लेणीतील हा शेवटचा चैत्य असून हा महायानास समर्पित आहे. तर यामध्ये वज्रयाणाची काही शिल्पे पहावयास मिळतात. यालाच सुतार की झोपड़ी किंवा विश्वकर्मा मंदिर ही म्हणतात. गुहेत प्रवेश केल्याबरोबरच भगवान बुद्ध बोधीवृक्षाखाली ( पिंपळ ) बसलेले दिसत असून धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बघायला मिळतात. भगवान बुद्धाच्या उजव्या हाताला बोधिसत्व पद्मपाणी व डाव्या हातास बोधिसत्व वज्रपाणी पहावयास मिळतात. तर मागच्या बाजूस स्तूप आहे. लेणीतील छतास गज पृष्ठाकृती आकार दिलेला दिसून येतो. तर समोरच वाद्य मंडप दिलेला असून पूर्वीच्या काळी या ठिकाणी ढोल वाजवून सकाळी व संध्याकाळी बुद्ध वंदनेस बोलविण्याची प्रथा होती. 

इतिहास अभ्यासक डॉ. संजय पाईकराव, अशोक नगरे, सुरज जगताप, डॉ. सोनाली म्हस्के, अरविंद जोगदंड, प्राचार्य गायकवाड, सुनिल खरे, दिपक गायकवाड, डॉ. राहुल बचाटे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि भाविक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. दरम्यान, सदरील किरणोत्सव सोहळा बघण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने या ठिकाणी खुलताबाद पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण