छत्रपती संभाजीनगर : गुरुवार, शुक्रवारी तापलेल्या उन्हाच्या झळांबरोबरच महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे नागरिक होरपळून निघाले. उन्हाळ्यात ४० टक्के विजेची मागणी वाढलेली असताना शहराला वीजपुरवठा करणाऱ्या २८ उपकेंद्रांची क्षमता धापा टाकत आहे. वाढत्या तापमानामुळे गुरुवारी वीजवाहिन्यांचे भाग, उपकरणे जळून गेल्याने बारा तासांपेक्षा अधिक काळ अर्ध्याअधिक शहराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने लाखो नागरिकांना नाहक हाल सोसावे लागले.
गुरुवारसह शुक्रवारी अर्ध्याअधिक शहरात सहा ते सात वेळा १२ तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचा संताप झाला. अनेक भागांत दुपारपासून वीज नसल्याने बाजारपेठ ठप्प होऊन लाखोंच्या उलाढालीवर परिणाम झाला. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत जवळपास ४० टक्के वीजपुरवठ्यावर अधिक भार वाढला. नागरिकांनी सातत्याने हेल्पलाईनवर संपर्क करूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. नियमाप्रमाणे वीजपुरवठा खंडित होण्याचा मेसेज येणे अपेक्षित असताना तो आला नाही. नागरिकांनी केंद्रावर जाऊन विचारणा केल्यावरही असमाधानकारक उत्तरे देण्यात आल्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले. एकीकडे उकाडा वाढला असताना महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा पारा चढला होता.
या परिसरात वीजपुरवठा खंडित- मदनी कॉलनीत गुरुवारी सायं. ५ ते रात्री ११- गुरुदत्त नगर, गजानननगर, विजयनगर : १४ तास वीज नाही; महावितरणकडून उद्धट उत्तरे- गारखेडा, शिवाजीनगर, आदित्यनगर : शुक्रवारी सकाळी ६ ते ८, गुरुवारी सायं. ४:३० ते रात्री ११:३०- देवळाई, माऊलीनगर, नाईकनगर, खडी रोड : गुरुवारी ५ तास, शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ३-पुंडलिकनगर : गुरुवारी रात्री १० ते मध्यरात्री २- नारेगाव : गुरुवारी रात्री ८ ते पहाटे ४
- शहर मंडळात ३३ केव्ही क्षमतेची एकूण २८ उपकेंद्रे.-११ केव्ही क्षमतेचे २१० फीडर
ग्राहक संख्याघरगुती - ३ लाख ९ हजार ९५७व्यावसायिक - ३६ हजार ७३४औद्योगिक -६ हजार ९३८इतर - ६ हजार ४१५एकूण - ३ लाख ६० हजार ४४
१८ % वीजपुरवठा अपुरासामान्यत: शहरात ३१९ मेगावॅटपर्यंत वीजपुरवठा हाेतो. एप्रिल, मेमध्ये ३८० ते ४०० मेगावॅटपर्यंत मागणी वाढते. या वाढलेल्या १८ टक्के विजेची मागणी पूर्ण करण्याची क्षमता महावितरणकडे नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
उपकरणे जुनाट, क्षमता संपली- मुख्य वीजपुरवठ्याचे १३२ केव्ही केंद्र शहराबाहेर असल्याने वीजवाहिन्यांवर ताण येतो. याचे एक केंद्र शहरात असणे अपेक्षित. मात्र, हा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित.- उन्हाळ्यात फ्रीज, फॅन, कूलर, एसीचा वापर वाढल्याने विजेची मागणी वाढल्यानंतर जुनाट, क्षमता संपलेल्या उपकरणांना हा भार असह्य होतो. यासाठी महावितरणकडे ठोस आराखडाच नाही.- एकीकडे वाढत्या वसाहती, मोठ्या इमारतींची संख्या वाढताना ३३/११ केव्ही उपकेंद्रांची क्षमता कमी पडल्याने दाब वाढून वीजपुरवठा खंडित होतो.
समस्या कायमची संपेलओव्हरलोड टाळण्यासाठी लवकरच दोन नवीन वीजवाहिन्यांना मंजुरी मिळणार आहे. १२ उपकेंद्रांची क्षमता वाढविली जाणार असून, कडा येथे १३२ केव्हीचे नवीन उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे.– मनीष ठाकरे, अधीक्षक अभियंता, महावितरण