शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

टेलर शॉप दुसऱ्यांदा फोडले; शिलाई मशीनसह शिवलेल्या ड्रेसवर चोरट्यांचा डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 19:01 IST

व्यवसाय सुरू केल्यानंतर चार महिन्यात दुसऱ्यांदा चोरी

पैठण : पैठण बसस्थानक परिसरात असलेल्या टेलरींग दुकानाचे कुलूप तोडून शिलाई मशीनसह नवीन कपडे चोरट्यांनी लंपास केले आहे. विशेष म्हणजे चार महिण्या पूर्वी सुध्दा चोरट्यांनी दुकान फोडून शिलाई मशीन व कपडे चोरून नेले होते. आता पुन्हा चोरी झाल्याने टेलर हताश झाले आहे.

पैठण बसस्थानक परिसरातील श्रीनाथ टेलर दुकानाचे बुधवारी रात्री कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील  शिलाई मशीन शिवलेले दहा शर्ट, दहा पॅंट, तसेच शिवायला आलेले कपडे सात ड्रेस असा एकूण १२५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे चार महिण्या पूर्वी देखील अशाच पध्दतीने चोरी झाली होती. तेव्हा सुध्दा चोरट्यांनी शिलाई मशीन व कपडे चोरून नेले होते. त्यावेळेस टेलर बाळासाहेब भास्करराव म्हस्के (४०) रा आखतवाडा यांनी या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली नव्हती.

दरम्यान, पुन्हा शिलाई मशीन आणून बाळासाहेब म्हस्के यांनी व्यवसाय सुरू केला होता. परंतु चार महिन्यात पुन्हा चोरी झाल्याने टेलर बाळासाहेब म्हस्के हताश झाल्याचे दिसून आले. या बाबत बाळासाहेब म्हस्के यांनी पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दांडगे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीAurangabadऔरंगाबाद