शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

तिसगाव चौफुलीवर गॅरेजमध्ये तुफान राडा; कामगारांना मारहाण, चौघे जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:35 IST

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

वाळूज महानगर : तिसगाव चौफुली परिसरात दि. २९ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विघ्नहर्ता ऑटो केअर या गॅरेजमध्ये पाच ते सहा जणांच्या टोळक्याने तुफान राडा घालत कामगारांना बेदम मारहाण केली. गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली असून, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गॅरेजमध्ये एका वाहनाचा बंपर फिट करण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यावेळी कामगार जेवण करत असताना, टोळक्यातील काहीजणांनी आत्ताच काम करा, अशी मागणी केली. गॅरेजमध्ये असलेल्या चौघांना जबर मारहाण केली. शॉकअप, टॉमी आणि ड्रम यासारख्या साधनांनी केलेल्या मारहाणीत ऋषिकेश काळे, राहुल लिंबे, कुणाल पवार व सौरभ दातार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विघ्नहर्ता ऑटो केअर हे गॅरेज ऋषिकेश काळे आणि राहुल लिंबे यांच्या भागीदारीत सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी एमआयडीसी वाळूज पोलिस दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकारामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर