शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांनी अर्भकाचा मृतदेह उकरून काढल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 12:45 IST

वाळूज कब्रस्तानात दफन केलेला मृतदेह भटक्या कुत्र्यांनी उकरुन काढल्याची माहिती कळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

वाळूज महानगर : वाळूज कब्रस्तानात महिनाभरापूर्वी दफन केलेले पुरुष जातीचे अर्भक भटक्या कुत्र्यांनी बुधवारी (दि.६) दुपारी १२ वाजेच्या सुमारास उकरुन काढल्याने खळबळ उडाली. या अर्भकाची विल्हेवाट लावणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूजच्या उर्दू जिल्हा परिषद शाळेजवळील शासकीय गायरान जमिनीत विविध समाजाची सार्वजनिक स्मशानभूमी व कब्रस्तान आहे. कब्रस्तानात दफन केलेल्या अर्भकाचा मृतदेह उकरुन काढून भटकी कुत्रे बुधवारी दुपारी त्याचे लचके तोडत होते. हा प्रकार लक्षात येताच दक्ष नागरिकांनी माहिती वाळूज पोलिसांना दिली. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलिस आयुक्त महेंद्र देशमुख, वाळूजचे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुडे, सहायक निरीक्षक अमोल ढोले, उपनिरीक्षक संदीप शेवाळे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेऊन त्यास शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखलहा मृतदेह पूर्ण वाढ झालेल्या अर्भकाचा असल्याचे पोलिसांनी प्रथमदर्शनी केलेल्या पाहणीतून पुढे आले. अज्ञात व्यक्तीने कुणालाही न कळविता त्यास कब्रस्तानात पुरल्याचा अंदाज वर्तविला आहे. वाळूजला अर्भक सापडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी पोकॉ तुषार सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढोले हे करीत आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdogकुत्रा