शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आज महिलांवर होणारे अत्याचार पाहता लाज वाटावी, अशी परिस्थिती: भालचंद्र नेमाडे

By बापू सोळुंके | Updated: August 12, 2023 12:59 IST

ब्रिटिशांनी एवढी पापं केली की त्यांना काही फाइल बंद ठेवाव्या लागल्या.

छत्रपती संभाजीनगर : बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव यांनी महिलांच्या कल्याणासाठी अनेक कायदे केले. आज महिलांवर होणारे अत्याचार पाहता लाज वाटावी, अशी परिस्थिती आहे. पिंपरी चिंचवडमधून दरवर्षी ३०० मुली पळविल्या जातात, तर आसाममध्ये घरकामासाठी दीड लाखात मुलीची विक्री होते. मणिपूरची भयावह परिस्थिती पाहता प्रत्येक जाती-जमातीसाठी स्वतंत्र कायद्याची गरज आहे, असे मत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.

साहित्यिक बाबा भांड संपादित सार्वभौम महाराजा सयाजीराव स्वातंत्र्यवीरांचे पाठीराखे पुस्तकांचे प्रकाशन शुक्रवारी सायंकाळी एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात बडोदा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगीराजे गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. नेमाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम आणि प्रा. डॉ. उमेश बगाडे, लेखक भांड व्यासपीठावर उपस्थित होते.

नेमाडे म्हणाले की, ब्रिटिशांनी एवढी पापं केली की त्यांना काही फाइल बंद ठेवाव्या लागल्या. यातील पंधरा फायलींमधून सयाजीरावांनी क्रांतिकारकांना केलेल्या मदतीचे तपशील मिळतात. त्यांनी सामाजिक सुधारणा अधिक केल्या होत्या. पण, आपल्या इतिहासात त्यांचा उल्लेखही नव्हता. बाबा भांड यांनी लंडनमधील बंद फायलींचा अनुवाद करून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये हे ग्रंथ प्रकाशित केल्याने त्यांचा गुरू म्हणून अभिमान वाटतो. राजद्रोहाच्या कायद्याचा ब्रिटिशांनी स्वैर वापर केला होता. पण, ७५ वर्षांनंतरही आपल्या देशात हा कायदा लागू आहे. स्वातंत्र्याला बेदखल करणारा हा कायदा आहे.

सयाजीराव स्वातंत्र्याचे भोक्तेहा ग्रंथ आपल्याला समकालीन परिस्थितीचा विचार करायला भाग पाडतो. महाराष्ट्र हा स्वातंत्र्याची प्रेरणा असलेली भूमी आहे आणि सयाजीराव त्या प्रेरणेचे भोक्ते होते. त्यांची राष्ट्रीय चळवळीला सहानुभूती होती, असे डॉ. बगाडे म्हणाले. ब्रिटिश लायब्ररीतून बंद असलेल्या पंधरा फाइल मिळाल्या. त्यातून स्वातंत्र्य चळवळीवर प्रकाश टाकता आला, असे बाबा भांड प्रास्ताविकात म्हणाले. प्रकल्पासाठी सहकार्य करणारे राहुल मगर, प्राचार्य एम. एम. तांबे, शाहीर अजिंक्य लिंगायत आणि संतोष पाटे यांचा सत्कार करण्यात आला. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले. शिव कदम यांनी आभार मानले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्यmarathiमराठी