शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

१४ महिन्यांत एकाच दुकानात चारवेळा चोरी; तीनवेळा सिगारेट तर आता सुकामेवा, रोकड लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 15:49 IST

चारही वेळा सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांना दिले; परंतु पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्याची तसदी घेतलेली नाही.

गल्लेबोरगाव (जि. औरंगाबाद) : खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील बसस्थानक परिसरात जुन्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका किराणा दुकानात गेल्या १४ महिन्यांत ४ वेळा चोरी झाली असून चोरट्यांनी तीन वेळा या दुकानातून महागड्या सिगारेटची चोरी केली तर चौथ्या वेळी रविवारी मध्यरात्री काजू, बदाम आणि ५० हजार रुपयांची रक्कम लंपास केली.

गल्लेबोरगाव येथे बसस्थानक परिसरात रामदास चंद्रटिके यांचे पवन किराणा दुकान आहे. या दुकानात चोरट्यांनी यापूर्वी ८ मे २०२२ रोजी चोरी करून ७० हजार रुपयांच्या महागड्या सिगारेटची चोरी केली होती. ही चोरी या किराणा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यात दुकानातील एक व्यक्ती पत्र्याच्या शेडवरील दुसऱ्या व्यक्तीला खालून सिगारेटचे पोते देताना दिसत आहे. दुकान मालक चंद्रटिके यांनी याबाबत खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण केली. सीसीटीव्हीचे फुटेज उपलब्ध असूनही चोरट्यांचा शोध घेतला नाही.

त्यानंतर १ ऑगस्ट २०२२ रोजी चोरट्यांनी या दुकानात पुन्हा चोरी करून १ लाख ५१ हजार ७०० रुपयांच्या सिगारेट चोरून नेल्या. पुन्हा चंद्रटिके यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासाकडे पुन्हा दुर्लक्ष केले. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढले. त्यामुळे २२ मे २०२३ रोजी पुन्हा या चोरट्यांनी हे दुकान फोडून ६० हजार रुपयांच्या सिगारेट चोरून नेल्या. दुकान मालक चंद्रटिके यांनी पुन्हा तीच प्रक्रिया पार पाडली. पोलिसांनीही तीच ती री ओढली. तीन वेळा चोरी करूनही पोलिस कारवाई करीत नसल्याने चोरटे बिनधास्त झाले. त्यांनी २३ जुलैच्या मध्यरात्री पुन्हा हे दुकान फोडले; परंतु यावेळी चंद्रटिके यांनी महागड्या सिगारेट लॉकरमध्ये ठेवल्याने लॉकर फोडण्यात चोरट्यांना अपयश आले. मग त्यांनी दुकानातील २० किलो काजू, २० किलो बदाम आणि गल्ल्यातील ५० हजार रुपये असा ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. आता पुन्हा दुकान मालक चंद्रटिके यांनी खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेहमीप्रमाणे पोलिस या घटनेचा तपास न करता प्रकरण थंड बस्त्यात टाकतात की आता तरी चोरट्यांचा शोध घेतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

चारही चोरींची पद्धत एकचचंद्रटिके यांच्या पवन किराणा दुकानात १४ महिन्यांत चार वेळा चोरी झाली. चारही वेळा चोरट्याने एकाच पद्धतीने चोरी केली आहे. यात चोरट्याने दुकानाच्या विविध बाजूंनी पत्रा कापून चोरी केली आहे, तसेच चारही वेळा झालेल्या चोरीत एकच चोरटा दुकानातील सीसीटीव्हीत दिसून येत आहे; परंतु तो एकच आहे की अन्य कोणी हे सांगता येणे कठीण आहे. या सीसीटीव्हीचे फुटेज चंद्रटिके यांनी पोलिसांना दिले आहे; परंतु पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्याची तसदी घेतलेली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद