शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेअर मार्केटच्या नावाखाली २३ लाखांना नातेवाइकालाच गंडविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:45 IST

वैजापुरातील प्रकार; तीनजणांविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर : शेअर मार्केटच्या माध्यमातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील अर्थप्लस इनव्हेस्टमेंट नावाच्या एजन्सीने वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील पणन महासंघाच्या सेवानिवृत्त ग्रेडरला २२ लाख ७३ हजार ५०० रुपयांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध शुक्रवारी रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जांबरगाव येथील सेवानिवृत्त ग्रेडर सुनील पाटील यांचा पुतण्या आरोपी विनोद उत्तम पाटील हा सध्या पुणे येथे राहतो. तो शेअर मार्केटचे काम करतो. दुसरा आरोपी सुनील गंगाधर पाटील हा बीएएमएस डॉक्टर असून, विनोद पाटील याचा मेहुणा तर तिसरा आरोपी नवनीत पाटील हा आरोपी विनोद पाटील याचा मावसभाऊ आहे. या तिघांनी पुण्यातील वाकड भागात अर्थप्लस इनव्हेस्टमेंट नावाची एजन्सी सुरू केली. तक्रारदार सुनील पाटील यांच्या पुण्यात राहणाऱ्या मुलीने २०२१ मध्ये या तिघांच्या कंपनीत काही रक्कम गुंतविली व तिला चांगला परतावा मिळाला. पाटील यांची पत्नी वंदना या एकदा मुलीस भेटण्यासाठी पुण्यात गेल्या असता मुलीने आईला शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत सांगितले व विनोद पाटील, सुनील पाटील व नवनीत पाटील यांच्या ऑफिसला भेट दिली. त्यावेळी आरोपींनी दोघींना शेअर मार्केटमध्ये कसे काम चालते, याबाबत सांगितले. त्यानंतर वंदना यांनी घरी जांबरगाव येथे आल्यानंतर पती सुनील पाटील यांना याबाबत माहिती दिली. सुनील पाटील यांना निवृत्तीनंतर ५० लाख रुपयांची रक्कम मिळाली होती. ही रक्कम गुंतविण्यासाठी त्यांनी पुतण्या विनोद पाटील याच्या आई-वडिलांना फोनवर विचारून माहिती घेतली. त्यामुळे सुनील पाटील यांनी आरोपींना विचारले असता आम्ही, तुम्हाला गुंतविलेल्या रकमेच्या चार टक्के मुद्दल व चार टक्के व्याज दरमहा परतफेड देऊ, असे आमिष दाखविले.

१७ लाख दिले अन् नंतर मारली थापया आमिषाला भुलून तक्रारदार सुनील पाटील यांनी ८ ऑगस्ट ते ७ फेब्रुवारी २३ या कालावधीत एकूण ४० लाख रुपये आरोपींनी दिलेल्या बॅंक खात्यात भरले. त्यातील १७ लाख २६ हजार रुपये परत मिळाले; परंतु उरलेल्या रकमेबाबत विचारणा केली असता ज्या ठिकाणी पैसे गुंतविले ती व्यक्ती खूप मोठ्या रकमेचा अपहार करून पळून गेल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुनील पाटील यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यावरून विनोद उत्तमराव पाटील, सुनील गंगाधर पाटील व नवनीत हिरालाल पाटील या तिघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर