शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गतिमंद आईचा शोध घेण्याचा बहाणा, अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाचा अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 16:07 IST

आईला शोधण्याचा बहाणा करत अत्याचार, नराधमास पोलिसांनी केले जेरबंद

- मेहमूद शेखवाळूज महानगर : गतिमंद आईच्या शोधासाठी घराबाहेर पडलेल्या वाळूज परिसरातील एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर नात्यातीलच एकाने अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पिडीत अल्पवयीन निशा (१०, नाव बदलेल आहे) हिच्या वडीलांचे निधन झाले असून तिला दोन बहिणी व एक लहान भाऊ आहे. आई रेखा (नाव बदलेल आहे) गतिमंद असल्याने निशा आई आणि इतर भावंडांसह आजोबांच्या घरी राहते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी माहेरी आलेल्या मावशीस निशा ही अबोल रहात असल्याचे आढळून आले. तिने विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी निशाने १ सप्टेंबरला आई घरातून गायब झाली होती. तिचा शोध घेत असताना नातेवाईक दिलीप वाघिल्या पवार (४५, रा.वाळूज परिसर) याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सांगितली.

हे ऐकून हादरलेल्या मावशीने याची माहिती वडिलांना दिली. त्यानंतर आजोबांनी सोमवारी वाळूज पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी लागलीच दिलीप वाघिल्या पवार (४५, रा.वाळूज परिसर) याच्याविरुध्द बाल लैंगिक अत्याचार कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला. तसेच रात्रीतून शोध घेत आरोपीस वाळूज परिसरातून जेरबंद केले. या प्रकरणी पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल ढोले हे करीत आहेत.

हतबल मुलीवर केला अत्याचार१ सप्टेंबरला आईचा शोध घेत असताना रात्री ८ वाजता नातेवाईक असलेला दिलीप वाघिल्या पवार (४५, रा.वाळूज परिसर) हा भेटला. दिलीपने आईचा शोध घेण्यास मदत करतो म्हंटले. परिचित असल्याने निशा त्याच्यासोबत आईच्या शोधात पंढरपूरात गेली. येथे आई सापडली. रात्री बराच उशीर झाल्याने वाळूजजवळ एका टपरीच्या जागेत तिघेही झोपी गेले. मात्र, मध्यरात्री अचानक दिलीप झोपेतील निशासोबत अश्लिल चाळे करू लागला. विरोध केला असता दिलीपने जीवे मारण्याची धमकी देत निशावर अत्याचार केला. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद