शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चोरट्यांचा धुमाकूळ; छत्रपती संभाजीनगरात एकाच दिवशी ७ दुचाकी चोरीस

By राम शिनगारे | Updated: March 24, 2023 19:09 IST

शहराच्या विविध भागातून दुचाकी वाहने लंपास करणाऱ्यात आल्याचे पुढे आले आहे

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. २३ मार्च रोजी शहरात ७ दुचाकी चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढतच आहेत. त्यात दुचाकी चोरीचा उलगडा होण्याच्या प्रमाण अत्यल्प आहे.

मयंक राजेश अग्रवाल (रा.बन्सीलालनगर) यांची दुचाकी (एमएच २० सीके ५६६७) चोरट्याने २८ फेब्रुवारीच्या रात्री तर पवन राजेंद्र मिसाळ (रा.कार्तिकनगर, मयुरपार्क परिसर) यांची दुचाकी (एमएच २० ईक्यू ९५०२) चोरट्याने १७ मार्च रोजी एमजीएम हॉस्पीटलजवळून चोरून नेली. सुमित सुभाष निंदाने (रा.न्यु.नंदनवन कॉलनी) यांची दुचाकी (एमएच २० जीडी ७७०१) चोरट्याने २२ मार्चच्या रात्री घराजवळून चोरून नेली.राजवीर दिनेशसिंग परदेशी (रा.आयुष अपार्टमेंन्ट, सुराणानगर) यांची दुचाकी (एमएच २० एफएक्स ०१०१) चोरट्याने सिग्मा हॉस्पीटल जवळून चोरून नेली. मारोती वसंतराव फड (रा.पवननगर, रांजणगाव-शेणपुंजी) यांची दुचाकी (एमएच ४४ जे ७५६४) चोरट्याने १९ मार्च रोजी घराजवळून चोरून नेली. बळीराम उत्तम राठोड (रा. फाईव्ह स्टार कॉलनी, राजनगर,मुकुंदवाडी) यांची दुचाकी (एमएच २० ईडी १९१०) चोरट्याने २० मार्च रोजी घराजवळून चोरून नेली. एका महिलेची दुचाकी (एमएच २० एफएच ८९८१) चोरट्याने २१ मार्च रोजी प्रोझोन मॉलजवळून चोरुन नेल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला.

या ठाण्यात गुन्ह्यांची नोंदशहराच्या विविध भागातून दुचाकी वाहने लंपास करणाऱ्या चोरट्याविरुद्ध अनुक्रमे सिडको पोलिस ठाण्यात २ तर छावणी, जवाहरनगर, एमआयडीसी वाळूज, मुकुंदवाडी आणि एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात प्रत्येकी १ असे सात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद