शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

सायबर क्राइमचा नवा ट्रेंड, बनावट कागदपत्राद्वारे आता 'व्हीआयपी मोबाइल’ नंबर हॅक

By सुमित डोळे | Updated: March 2, 2024 19:31 IST

लाखो रुपये किमतीचे हे क्रमांक सायबर गुन्हेगारांकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर पोर्ट आऊट केले जात आहेत.

छत्रपती संभाजीनगर : विविध वेबसाइट, मोबाइल हॅक करून लाखो रुपये हडप केले जाण्याचे प्रकार सायबर गुन्हेगारांच्या जगतात सामान्य झाले. आता हॅकर्सकडून हौशी लोकांकडे असलेल्या 'व्हॅनिटी/व्हीआयपी मोबाइल नंबर' हॅक केले जात असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत.

लाखो रुपये किमतीचे हे क्रमांक सायबर गुन्हेगारांकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर पोर्ट आऊट केले जात आहेत. विशेष म्हणजे, त्यानंतर ते क्रमांक थेट परराज्यात सुरू होत आहे. शहरासह राज्यातील इतरही शहरांत अशा घटना निदर्शनास आल्या आहेत.

उस्मानपुऱ्यातील ४३ वर्षीय कापड व्यावसायिकाकडे बीएसएनएल कंपनीचा एक व्हीआयपी क्रमांक होता. गेल्या १२ वर्षांपासून तो क्रमांक वापरत होते. त्याचा फारसा वापर नसला तरी ते क्रमांक सुरू ठेवण्यासाठी आवश्यक रक्कम भरत होते. काही दिवसांपूर्वी मात्र तो क्रमांक अचानक बंद पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कंपनीकडे विचारपूस केल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यांचा व्हीआयपी क्रमांक परस्पर जीओ कंपनीत पोर्ट झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. तो क्रमांक सिंदखेडराजाच्या ग्राहक सेवा केंद्रातून पोर्ट आऊट करण्यात आला. व्यावसायिकाने त्यासाठी कुठलीही प्रक्रिया पार पडलेली नव्हती. त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांकडे याबाबत तक्रार केली.

बीडच्या डॉक्टरसोबत प्रकारबीडच्या दोन डॉक्टरांसोबत असाच प्रकार घडला. दोघांकडे व्हीआयपी मोबाइल क्रमांक होता. मात्र, दीड महिन्यापूर्वी सिम नेटवर्क चालले गेले. तांत्रिक कारण असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, ४८ तास उलटल्यानंतरही नेटवर्क न आल्याने त्यांनी कंपनीकडे चौकशी केल्यावर त्यांचा क्रमांक त्यांचा राहिलाच नसल्याची धक्कादायक माहिती त्यांना सांगण्यात आली.

नेमके कसे होते हॅक ?-सिम कार्ड स्वॅपिंग, क्लोनिंगच्या मदतीने एखादी व्यक्ती तुमच्या सिम कार्डचा ॲक्सेस मिळवू शकते. या सिम कार्ड स्कॅममुळे तुमची खासगी माहिती देखील त्यांच्या हाती लागते.-सायबर गुन्हेगार व्हीआयपी क्रमांकाची यादी मिळवतात. तो सुरू आहे की नाही, याची खात्री करतात.-क्रमांकाचा फार वापर नसल्यास ग्रामीण भागात तोच क्रमांक हरवल्याची तक्रार करतात. बनावट आधार कार्डचा वापर करून त्याच क्रमांकाच्या नव्या सिम कार्डसाठी अर्ज करतात.-सिम कार्ड प्राप्त होताच तत्काळ पोर्टआऊटची प्रक्रिया पार पाडून तो दुसऱ्या राज्यात लाखो रुपयांना विकतात.

बँक व्यवहारासाठी देखील वापरहॅकर्स फिशिंग, स्मिशिंगद्वारे क्रमांकधारकाची बँक खात्याची माहितीद्वारे मोबाइल क्रमांक मिळवतात. त्यानंतर मूळ सिम ब्लॉक करण्यासाठी बनावट कागदपत्रांसह मोबाइल ऑपरेटरच्या रिटेल आउटलेमध्ये अर्ज करतात. पडताळणीनंतर मूळ कार्डधारकाचे सिमकार्ड निष्क्रिय केले जाते. परिणामी, तक्रारदार व्यक्तीला नवीन सिम कार्ड प्राप्त होते. अनेकदा बँक खात्यातील व्यवहारांसाठी देखील हे नवीन सिम वापरले जाते.

क्रमांकाची हौस, लाखोंची किंमतव्हीआयपी व चॉइस नंबरसाठी अनेक जण लाखो रुपये मोजण्यास तयार असतात. व्हीआयपी क्रमांक विकणाऱ्या अनेक वेबसाइट देखील उपलब्ध आहेत. शिवाय, टेलिकॉप कंपन्यांकडून ठरावीक कालावधीनंतर व्हीआयपी क्रमांकाचा लिलाव देखील होतो.

व्हीआयपी क्रमांक सुरू ठेवाठरावीक नेटवर्क कंपनीबाबत हे प्रकार घडत आहे. सिम बंद आढळल्यास गैरवापराची शक्यता असते. सिम कार्ड लॉक झाल्यास, नो व्हॅलिड संदेश आल्यास तत्काळ सर्व्हिस प्रोव्हायडरकडे संपर्क साधा. व्हीआयपी क्रमांक असल्यास त्याचा सातत्याने वापर सुरू ठेवा.-अमोल सातोदकर, सहायक निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी