शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बिडकीनजवळ मुख्य जलवाहिनी फुटली, जुन्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

By मुजीब देवणीकर | Updated: September 14, 2022 17:35 IST

. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद: शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी जलवाहिनी पैठण रोडवरील बिडकीनजवळ मध्यरात्री फुटली. महापालिकेकडून त्वरित दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, यामुळे शहर पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. 

औरंगाबादमध्ये एकीकडे नवीन जलवाहिनीचे काम सुरु आहे तर दुसरीकडे जुन्या जलवाहिनीला गळती देखील नियमित आहे. आयुमर्यादा संपलेल्या या जलवाहिनीवर सध्या शहराचा पाणीपुरवठा सुरु आहे. काल मध्यरात्री पैठण रोडवरील बिडकीनजवळ मुख्य जलवाहिनी फुटली. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामामुळे जुन्या शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.

चिखलामुळे दुरुस्तीत व्यत्यय बिडकीन जवळ एका शेतातून गेलेली जलवाहिनी फुटली आहे. त्या ठिकाणी आजूबाजुला शेती आहे. तसेच सातत्याने झालेल्या पावसाने सर्वत्र काळ्या मातीचा चिखल आहे. दुरुस्तीच्या कामासाठी जाणारी जेसीबी चिखलात फसत होती. गळतीच्या ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी डांबरी रोड पासून साधारण १० ते १५ मीटर अंतरावर मुरूम टाकून रॅम बनवावा लागला. त्यानंतर जेसीबी तिथे पोहाचली.

अनधिकृत नळ कापण्याची मोहीम तीव्र दरम्यान, शहरात तब्बल दीड लाखावर नळ कनेक्शन अनधिकृत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकारावर खंडपीठाने यापूर्वीच तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. खंडपीठाच्या आदेशानंतर महापालिकेने अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्याची माेहीम अधिक तीव्र केली. मंगळवारी पीरबाजार चौकातील १०८ अनधिकृत नळ कनेक्शन कापण्यात आले. विशेष बाब म्हणजे एकच ठिकाणी तब्बल ५४ जोडण्या होत्या. अनेक नागरिकांनी पाणी जास्त यावे म्हणून १ आणि २ इंची नळ कनेक्शन घेतले होते. ही कारवाई मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली क्रमांक एकच्या पथकाने केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका