शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
3
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
4
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
5
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
6
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
7
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
8
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
9
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
10
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
11
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
12
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
13
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
14
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
15
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
16
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
17
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
18
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
19
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
20
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?

Gangapur: छेडछाडीचा जाब विचारताच टोळक्याचा मुलीसह कुटुंबावर हल्ला; छ.संभाजीनगरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:10 IST

Gangapur Family Attack: याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर: मुलीची छेड काढून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना वाळूज भागातील जोगेश्वरी येथे बुधवारी घडली. मुलगी तिचे आई-वडील, बहीण यांना टोळक्याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलगी, आई, वडील, भाऊ व बहिणीसह जोगेश्वरी येथे भाड्याच्या घरात राहतात. आई, वडील खासगी नोकरी करतात. मंगळवारी (दि. ४) रोजी नववीच्या वर्गात शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी येत होती. त्यावेळी आरोपी नीलेश दुबिले, ऋषीकेश दुबिले, प्रतीक राजपूत यांनी तिला अश्लील हातवारे करीत तिचा पाठलाग करत असल्याचे तिने घरी आल्यानंतर सांगितले. तिची आई घराबाहेर आली असता तिघेही पळून गेले. बुधवारी (दि. ५) रोजी अंदाजे ५:३० वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घराचा ओटा झाडत असताना नीलेश दुबिले, ऋषीकेश दुबिले, प्रतीक राजपूत यांनी तिला पाहून आवाज दिला व तिच्या मनात लज्जा वाटेल असे कृत्य केले. 

जाब विचारणा करताच कुटुंबाला मारहाणयाबाबत मुलीच्या कुटुंबाने जाब विचारला असता, टोळक्याने शिवीगाळ करत लाकडी दांड्याने तसेच जे हातात येईल त्याने पीडित मुलीच्या आईला छातीवर लाथेने व डोक्यात काहीतरी मारून जखमी केले. वडिलांनाही ते तिघे मारत असताना तेथे प्रवीण डिगंबर काजळे, कृष्णा काजळे, सतीश काजळे हे भांडण सोडवण्यास आले, तेव्हा त्या तिघांनाही हाताचापटाने मारहाण करून शिवीगाळ केली. त्या तिघांसोबत आणखी काही मुले असण्याचा संशय आहे. कारण मारहाण करीत असताना तेथे लोकांची गर्दी झाली होती. याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी नीलेश दुबिले, ऋषीकेश दुबिले, प्रतीक राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीViral Videoव्हायरल व्हिडिओsexual harassmentलैंगिक छळ