शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तलावातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तरुण गणेशभक्त मूर्तीसह बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 16:30 IST

मित्रांसोबत फोटो काढल्यानंतर विसर्जनासाठी तरुण मूर्तीसह तलावात उतरला होता; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने मातापिता कासावीस

- संतोष उगलेवाळूज  महानगर ( छत्रपती संभाजीनगर) :  घरातील लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी घाणेगाव पाझर तलावात उतरलेल्या २१ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. अभय सुधाकर गावंडे (वय २१, रा. नर्सरी कॉलनी, रांजणगाव ता. गंगापूर जि. छञपती संभाजीनगर) असे मृत तरूणाचे नाव आहे. एकूलता एक मुलाच्या मृत्यूने त्याच्या आई-वडीलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

अभयचे वडील सुधाकर गावंडे हे उद्योगनगरितील एका खाजगी कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करतात. पत्नी आणि एकुलता एक मुलगा अभय यांच्यासह ते रांजणगावात राहतात. ७ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात अभयने घरी लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली. त्यानंतर कुटूंबीयांसह दहादिवस मनोभावे पुजा-अर्चा करून १७ सप्टेंबर रोजी तिघा मित्रांसह तो श्रींचे विसर्जन करण्यासाठी लगतच्या घाणेगाव पाझर तलावाकडे गेला होता. मूर्तीसह तलावात उतरलेला अभय खड्ड्यांचा अंदाज न अचानक पाण्यात बुडाला. सोबतच्या मित्रांना देखील पोहता येत नव्हते. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता काही तरुण धावून आले. मात्, त्यांच्या हाती अभय लागला नाही. काही वेळाने अग्निशमन दलाच्या जवानांनी अभयचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. 

खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ‘मूर्तीसह तोही बुडाला’लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यापूर्वी अभयने मृती हातात घेवून मित्रांसोबत फोटो काढले. त्यानंतर विसर्जन करण्यासाठी मित्रांसह तोही मूर्तीसह तलावामध्ये उतरला. गुडघ्यापर्यंत पाणी असल्याने तो इतर मित्रांपासून आतल्या बाजूने दुर-दुर जात होता. दरम्यान, मूर्तीसह अभय अचानक पाण्यात बुडाला. दोन वेळा गटांगळ्या खाऊन अभय वरती आला मात्र, त्यानंतर तो खोल पाण्यात बुडाला तो वर आलाच नाही. अभयला व त्याच्या मित्रांना पोहता येत नसल्याने सर्वांचा नाईलाज झाला.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024AurangabadऔरंगाबादDeathमृत्यू