शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

एक दिवसाचा पगार बळीराजासाठी! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय

By बापू सोळुंके | Updated: June 22, 2023 13:44 IST

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाची वेतन कपात

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी संततधार आणि अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर रब्बी आणि उन्हाळी पिकांचेही अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान केल्याने शेतकरी त्रस्त आहे. या शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही शासनाने दिली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामुळे सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना जून महिन्याचा पगार कमी मिळेल.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाची वेतन कपात : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

२६ कोटी ९७ लाख ४३ हजार ९० रुपयांचे नुकसानएप्रिल महिन्यात जिल्ह्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगाम आणि उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले. गहू काळा पडला, भाजीपाला आणि फळबागांचेही मोठे नुकसान झाले. अवकाळीमुळे जिल्ह्यात सुमारे १६ हजार १४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीसाठी प्रशासनाने २६ कोटी ९७ लाख ४३ हजार ९० रुपयांची मागणी शासनाकडे केली.

शासनाच्या निर्णयाचे स्वागतनैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांचे सतत नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचा पगार कपात केला जाईल. बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. यामुळे शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.- परेश खोसरे, जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना.

सामाजिक उपक्रमात अग्रेसर बळीराजाला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक दिवसाचे वेतन देण्यास आमच्या कर्मचाऱ्यांनी हरकत घेतली नाही. संघटनेनेच असा प्रस्ताव शासनास दिला होता. कोणत्याही सामाजिक उपक्रमासाठी सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेेचे कर्मचारी योगदान देतात.- डॉ. देविदास जरारे, राज्य उपाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना.

पेरणीपूर्व मदत द्यावीवर्षातून तीन वेळा नुकसान झाल्यानंतर एखाद्या वेळेस शासनाकडून भरपाई; तीसुद्धा तोकडी मिळते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन घेत असल्याचे कळते, ही चांगली बाब आहे. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये द्यायला हवेत.-कृष्णा पवार, शेतकरी, पिंप्री राजा.

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद