शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिकपणाचे कौतुक; अडीच तोळे सोने रिक्षा चालकाने केले परत, पोलिसांनी दिले रिवॉर्ड

By राम शिनगारे | Updated: January 23, 2023 19:26 IST

क्रांतीचौक पोलिसांनी काही वेळातच लावला छडा

औरंगाबाद : अहमदनगर येथून शहरात आलेल्या एकाची बॅग रिक्षात विसरली. त्या बॅगमध्ये आडीच तोळे सोन्याची दागिने होते. त्या व्यक्तीने तात्काळ क्रांतीचौक पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी विशेष पथकातील दोन हवालदारांनी तात्काळ रिक्षाचा शोध लावला. त्या रिक्षाचालकाने काही वेळातच रिक्षात विसरलेली बॅग ठाण्यात आणून मुळ मालकाला परत दिल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

क्रांतीचौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप शहाजी फुलकुंडे (रा. नागेश्वरवाडी) हे अहमदनगरहून औरंगाबादेत बसने आले होते. बसस्थानकात उतरल्यानंतर रिक्षामध्ये बसून नागेश्वरवाडी येथे आले. तेथे उतरल्यानंतर त्यांची एक बॅग रिक्षातच विसरली. रिक्षा निघून गेल्यानंतर त्यांना बॅग विसरल्याचे समजले. त्या बँगमध्ये अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने होते. त्यामुळे फुलकुंडे यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी डयुटी ऑफिसर असलेले उपनिरीक्षक अमोल सोनवणे यांनी फुलकुंडेची तक्रार ऐकून घेत घटनेची माहिती विशेष तपास पथकातील हवालदार संतोष मुदीराज व भाऊलाल चव्हाण यांना दिली. 

या दोघांनी फुलकुंडे यांच्यासोबत जात घटनास्थळाची पाहणी केली. तसेच बसस्थानक परिसरातील बातमीदाराकडून माहिती मिळवत रिक्षाचालकाचा शोध घेतला. तेव्हा रिक्षाचालक भाडे घेऊन मुकुंदवाडी भागाकडे जात होता. त्यास तात्काळ क्रांतीचौक पोलिस ठाण्यात पोहचण्याचे आदेश दिले. त्यानुसार रिक्षाचालक ठाण्यात आला. तेव्हा फुलकुंडे यांनी ठेवलेल्या जागीच रिक्षात बॅग आढळून आली. त्या बॅगमध्ये आडीच तोळ्याचे सोन्याचे गंठणही मिळून आले. ही बॅग मालकास उपनिरीक्षक अमाेल सोनवणे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. ही कामगिरी निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक साेनवणे, हवालदार संतोष मुदीराज, भाऊलाल चव्हाण, सिद्दीकी यांनी केली.

चालकास ५०० रुपये बक्षीसरिक्षाच्या चालकाने एक लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे दागिने असलेली बॅग सुरक्षीतपणे संबंधित मालकास परत केल्याबद्दल क्रांतीचौक पोलिसांनी रिक्षाचालकास रोख ५०० रुपयांचा रिवॉर्ड स्वत:च्या खिशातुन दिला. बॅग असलेल्या मालकाने पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद